India : एक, दोन नव्हे तर महाशक्ती होण्यासाठी भारताला हवेत इतके अंबानी आणि अडानी..नीती आयोगाच्या माजी सीईओंनी दाखविला आरसा..
India : भारताला महाशक्ती होण्याचे स्वप्न पडू लागली आहेत. पण त्यासाठीचा मार्ग सोपा नक्कीच नाही..
नवी दिल्ली : भारत जगाच्या नकाशावर महाशक्ती (Powerful Nation) म्हणून उदयास येण्याची कसरत करत आहे. देशाला महाशक्ती होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. यात वाईट काहीच नाही. पण त्यासाठीचे प्रयत्न किती तोकडे आहेत, याची जाणीव नीती आयोगाचे (Niti Aayog) पूर्व सीईओ अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी करुन दिले. त्यांनी देशाला आणि नियोजनकारांना आरसाच दाखविला. त्यांचा दावा समजून घेऊयात..तरच देश महाशक्ती होऊ शकतो..
Amitabh Kant यांना G-20 संघटनेचे शेरपा वा थिंक टँकर म्हणून ही ओळखल्या जाते. यावरुन त्यांचे महत्व किती आहे, हे अधोरेखित होते. त्यांनी भारताला हा टप्पा गाठण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील हे एका वाक्यात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी G-20 संघटनेचा नवीन लोगो आणि थीमचे उद्धघाटन केले. 1 डिसेंबरपासून भारत G-20 संघटनेचा अध्यक्ष होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ कांत यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.
अमिताभ कांत यांच्या मते, देशाला महाशक्ती म्हणून जगाच्या नकाशावर झेंडा फडकवायचा असेल तर, भारताकडे एक-दोन अंबानी आणि अडानी असून भागणार नाही. त्यासाठी भारताकडे 10 हजार अंबानी आणि 20 हजार अडानींची फौज असणे आवश्यक आहे.
अमिताभ कांत यांना G-20 संघटनेसाठी भारताकडून शेरपा म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. हे पद अत्यंत महत्वाचे मानण्यात येते. त्यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे शेरपा पद होते.
इंडोनेशियात होणाऱ्या G-20 संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. त्यानंतर भारताला या संघटनेचे अध्यक्षपद मिळणार आहे. G-20 संघटनेत ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रांस, रशिया, अमेरिका समवेत अनेक देशांचा समावेश आहे.