Micron Chip : खुशखबर! मायक्रॉन आली, अखेर चिप, सेमीकंडक्टर हबचे स्वप्न होणार साकार

Micron Chip : अखेर भारताचे सेमीकंडक्टर, चिपचे स्वप्न साकार होणार आहे. मायक्रॉन ही अमेरिकन कंपनी आहे. तिने भारतात चिप उत्पादनासाठी 825 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. टाटा समूह हा या कंपनीचा भारतातील भागीदार आहे. या कंपनीच्या प्रकल्पाची आज पायाभरणी झाली. त्याचे अनेक फायदे देशाला होईल.

Micron Chip : खुशखबर! मायक्रॉन आली, अखेर चिप, सेमीकंडक्टर हबचे स्वप्न होणार साकार
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 7:16 PM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : अमेरिकेतील मेमरी चिप उत्पादक कंपनी मायक्रॉनने (Micron) अखेर भारतात प्रकल्पासाठी नारळ फोडला. सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या (Semiconductor Project) उभारणीचा आज श्रीगणेशा झाला. गुजरात राज्यात या प्रकल्पाची उभारणी होत आहे. भारत सरकार गेल्या पाच वर्षांपासून सेमीकंडक्टर, चिप उत्पादनासाठी (Chip Manufacturer) आग्रही आहे. त्यासाठी अनेक धोरण सुद्धा राबविण्यात आली. पण प्रत्यक्षात चिप उत्पादनाला सुरुवात करता आली नाही. तैवान कंपनीच्या मदतीने प्रकल्प उभारण्याचे स्वप्न पण अजून प्रत्यक्षात आलेले नाही. पण मायक्रॉनने धडक मोहिम राबविल्याने भारत चिप, सेमीकंडक्टर हब म्हणून लवकरच नावारुपाला येईल, याची शाश्वती वाढली आहे. देशात रोजगार निर्मिती होईल. तर कार आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईससाठी आता अधिक वाट पाहावी लागणार नाही. जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा वाढेल.

गुजरात राज्यात पायाभरणी

गुजरात राज्यातील सानंद एमआयडीसीमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली. मायक्रॉनने भारतात या प्रकल्पासाठी टाटा समूहाशी हातमिळवणी केली आहे. या प्रकल्पात सेमीकंडक्टर असेम्बलिंग आणि चाचणी होणार आहे. लवकरच ही कंपनी कुशल मनुष्यबळासाठी भरती प्रक्रिया सुरु करत आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येईल. पुढील वर्षात हे काम पूर्ण झालेले असेल. पहिल्या टप्प्यात 4,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये इमारत उभारणी, प्रकल्पासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री यांचा समावेश आहे. टाटा या प्रकल्पाचे काम पाहिल.

हे सुद्धा वाचा

825 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर या प्रकल्पाची घोषणा झाली होती. हा संपूर्ण प्रकल्प 2.75 अब्ज डॉलरचा आहे. यामध्ये मायक्रॉन कंपनी 825 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तर गुजरात सरकार या प्रकल्पाचा 20 टक्के खर्च विविध योजनांमधून भागवेल.

रोजगाराच्या मोठ्या संधी

सानंद औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प उभारल्या जात आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प असेल. या प्रकल्पासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा मायक्रॉनने केली आहे. या प्रकल्पातून थेट 5000 जणांना नोकऱ्या मिळतील. तर 15000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मनुष्यबळाच्या हाताला रोजगार मिळेल. या प्रकल्पामुळे अनेक बदल होतील. त्यामाध्यमातून अनेक हातांना काम मिळेल, अशी आशा आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.