अंबानी-अदानी नाही तर हे आहेत भारतातील सर्वात मोठी दानशूर व्यक्ती
अंबानी आणि अदानी हे नाव सहज आपल्या तोंडावर कधी ना कधी येऊन जातं. पण देशातीस सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत याबाबत तुम्हाला कदाचित माहित नसेल. आज आपण या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. जे सर्वाधिक दान करतात.
मुंबई : भारतातील सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर अनेकांना याचं उत्तर माहित नसेल. पण सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचे उत्तर अनेकांना माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दान करण्याच्या बाबतीत IT कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर हे अव्वल स्थानावर आहेत. Edelgive Hurun India Philanthropy च्या मते, विप्रोचे अझीम प्रेमजी दान करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी हे देशातील तिसरे मोठे दानशूर व्यक्ती आहेत. याशिवाय कुमार मंगलम बिर्ला चौथ्या आणि गौतम अदानी पाचव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. गौतम अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आहेत. तर शिव नाडर हे संपत्तीच्या बाबतीत भारतीय अब्जाधीशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
शिव नाडर यांनी किती रुपये दान केले
अहवालानुसार अब्जाधीश शिव नाडर यांनी 2042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नाडर पाच वर्षांत तिसऱ्यांदा क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. 1774 कोटींच्या देणगीसह अझीम प्रेमजी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 376 कोटी दान केले आहेत तर कुमार मंगलम बिर्ला यांनी 287 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी 285 कोटी रुपयांची देणगी दिली.
टॉप १० दानशूर व्यक्ती
बजाज कुटुंब देणगीच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहे. वेदांताचे अनिल अग्रवाल, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन आणि रोहिणी नीलेकणी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस आणि आदर पूनावाला हे टॉप 10 यादीत आहेत.
हुरुन इंडियाचे एमडी अनस रहमान जुनैद म्हणाले की, हे वर्ष मोठ्या दानशूर व्यक्तींसाठी विक्रमी वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांत 100 कोटींहून अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांची संख्या 2 वरून 14 झाली आहे आणि 50 कोटींहून अधिक योगदान देणाऱ्या देणगीदारांची संख्या 5 वरून 24 झाली आहे. अहवालानुसार, टॉप 10 देणगीदारांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 5,806 कोटी रुपयांची देणगी दिली, तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण देणगी 3,034 कोटी रुपये होती.