BCCI Networth : कमाईत BCCI चा षटकार! या देशांना टाकले मागे

BCCI Networth : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI च्या कमाईचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसेल. या देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा बीसीसीआयची कमाई अधिक आहे. ही संस्था केवळ कमाईतच पुढे नाही तर कर भरण्यात पण अग्रेसर आहे.

BCCI Networth : कमाईत BCCI चा षटकार! या देशांना टाकले मागे
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 6:12 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI ची कमाई अनेकांसाठी धक्कादायक आहे. अनेकांनी विचार केला नाही इतकी कमाई ही संस्था करते. बीसीसीआयने केवळ क्रिकेटचे मैदानाच गाजवले नाही तर मैदानाबाहेर पण षटकार ठोकला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गेल्या पाच आर्थिक वर्षांत (FY18-FY22) 27,411 कोटी रुपयांची कमाई (Income) केली. आर्थिक राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत याविषयीची माहिती दिली. ही कमाई बीसीसीआयने मीडिया राईट्स स्पॉन्सरशिप डील्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) मिळालेल्या महसूलातून झाली. ही कमाई अनेक देशांच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक आहे. बीसीसीआय केवळ कमाईतच नाही तर कर भरण्यात पण पुढे आहे.

अनिल देसाई यांनी विचारला प्रश्न

राज्यसभेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी अर्थमंत्र्यांना याविषयीचा प्रश्न विचारला होता. जगातील दुसऱ्या सर्वता मोठ्या खेळाची ही भारतीय संघटना किती कमाई करते, याची सरकारला माहिती आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता. गेल्या पाच वर्षांत बीसीसीआयने किती कमाई केली. किती खर्च केला, किती कर भरला याची माहिती त्यांनी केंद्र सरकारला विचारली होती.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकार हिशोब ठेवत नाही

पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. जागतिक स्तरावरील क्रीडा संघटनांच्या आर्थिक स्थितीचा हिशोब केंद्र सरकार ठेवत नसल्याची माहिती त्यांनी दिली. पण बीसीसीआयची उपलब्ध पाच वर्षांतील आकडेवारी त्यांनी मांडली. या संघटनेचा हिशोब त्यांनी मांडला. या आकडेवारीवरुन बीसीसीआय महसूलाची माहिती समोर आली.

काय आहे आकडेवारी

2017 मध्ये बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आयोजीत केली होती. मीडिया राईट्सच्या माध्यमातून 16,147 कोटी रुपयांची कमाई केली. 2008 ते 2017 या 10 वर्षांत आयपीएल राईट्स सोनीला विक्री करण्यात आली. त्यामाध्यमातून 8200 कोटी रुपये कमाई झाली.

या देशांना कमाईत टाकले मागे

  • डॉमिनिका जीडीपी 68.1 कोटी डॉलर
  • टॉन्गो जीडीपी 54.1 कोटी डॉलर
  • किरीबाटी जीडीपी 24.8 कोटी डॉलर
  • नाऊरु जीडीपी 15.1 कोटी डॉलर

4298 कोटी कर

BCCI ने या पाच वर्षांत 4,298 कोटी रुपयांचा आयकर जमा केला. या दरम्यान बोर्डाने 15,170 कोटी रुपयांचा खर्च केला. आर्थिक वर्ष 2018 मध्ये बीसीसीआयने 2,917 कोटी रुपयांचा महसूल जमवला. मीडिया राईट्सच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 22 मध्ये 7,606 कोटी रुपये कमाई केली. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडण्याचा विक्रम करण्यात येणार आहे. त्यासाठी डिस्नी स्टार आणि Viacom 18 सोबत करार करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी 48,390 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

BCCI ने पाच वर्षांत इतका दिला कर

वर्ष कर             (कोटी)

2021-22          1,159

2020-21          845

2019-20          882

2018-19          815

2017-18          597

'...तर AK 47 घेऊन येतो', मयत मुलीच्या कुटुंबीयांना धमकी, CCTV समोर
'...तर AK 47 घेऊन येतो', मयत मुलीच्या कुटुंबीयांना धमकी, CCTV समोर.
'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य
'शिवराजने पंचांना गोळ्या घालायला...', पैलवान चंद्रहार पाटलांचं वक्तव्य.
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट
'मला भेटले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्...',जरांगेंचा गौप्यस्फोट.
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती
'मराठ्यांचा संयम सुटला तर...',जरांगे पाटलांची सरकारला हात जोडून विनंती.
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?
मुंडे यांचा राजीनामा होणार? अंजली दमानिया उद्या काय करणार गौप्यस्फोट?.
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?
'मविआ काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको',राणेंचा रोख नेमका कुणावर?.
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल
'गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना...', राक्षेच्या आईचा सवाल.
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख
'सामना'तून अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामनांचा 'खडूस' असा उल्लेख.
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ
राक्षेनं पंचांना मारली लाथ, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ.
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?
'माझ्या नादाला लागू नको', जरांगे-भुजबळांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप?.