Vinod Kambli : कधी कोट्यवधीचा मालक, आता 1000 रुपयांवर काढतोय दिवस

Indian Cricketer Vinod Kambali Networth : कधी काळी गोलंदाजांचा कर्दनकाळ असणार्‍या विनोद कांबळीची सध्याची अवस्था अनेक जणांचं काळीज चिरून गेली. सध्या कांबळीची संपत्ती 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर या दरम्यान असल्याचा दावा करण्यात येतो. पण त्याची वार्षिक कमाई केवळ 4 लाखांच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

Vinod Kambli : कधी कोट्यवधीचा मालक, आता 1000 रुपयांवर काढतोय दिवस
विनोद कांबळी संपत्ती
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 10:43 AM

अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय क्रिकेट विश्वात सुवर्ण अक्षरांनी स्वतःचे नाव कोरले आहे. त्यातील काही खेळाडू अचानक या मैदानावरून गायब झाले आहेत. त्यात विनोद कांबळी हे नाव पण एक आहे. सचिन तेंडूलकर सोबतच स्फोटक फलंदाज म्हणून तो ओळखल्या जात आहे. 18 जानेवारी 1972 रोजी विनोदचा मुंबईत जन्म झाला. क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर हे त्याला मास्टर ब्लास्टरपेक्षा अधिक गुणवंत मानत असत. क्रिकेट जगतातील कमी कालावधीत त्याने अनेक अविस्मरणीय खेळी खेळली. पण क्रिकेटमधील हा राव आता रंक झाला आहे.

1 हजारात काढतोय दिवस

रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या कार्यक्रमात विनोद कांबळी दिसल्यावर अनेकांच्या तोंडून वेदनाच बाहेर पडली. एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (BCCI) त्याला 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. त्यावरच त्याची गुजारण होत असल्याचे सांगण्यात येते. मुंबईसारख्या महागड्या शहरात ही कमाई तोकडी पडते. रोजच्या हिशोबाने त्याला 1 हजार रुपयांवर दिवस काढावा लागत असल्याचे दिसते.

हे सुद्धा वाचा

कधी किक्रेटच्या मैदानावर गोलंदाजांना चोपून काढणाऱ्या विनोद कांबळीची एकूण संपत्ती 1 ते 1.5 लाख डॉलर दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. पण सध्या त्याची वार्षिक कमाई 4 लाख रुपयांच्या जवळपास आहे. कांबळीकडे मुंबईत स्वत:चे घर आहे. त्याच्याकडे एक रेंज रोवर कार सुद्धा आहे. पण या कारचा खर्च कसा सोसावा ही चिंता आहे.

यापूर्वी कशी होत होती कमाई?

क्रिकेट जगताला रामराम ठोकल्यानंतर कांबळी याने कॉमेंट्री, जाहिराती आणि चित्रपटात अभिनय करण्याचा पर्याय निवडला. त्यातून त्याची चांगली कमाई होत होती. पण काळ बदलला, तसे त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत आटले. कोविड-19 महामारीत तर त्याची आर्थिक परिस्थिती अजून खालावली.

मित्र शिखरावर, कांबळी जमिनीवर

आपला अत्यंत जवळचा मित्र विनोद कांबळीची ही अवस्था सचिन तेंडूलकर याला सुद्धा वेदना देणारी आहे. दोघांचा क्रिकेटमधील प्रवास सोबतच सुरू झाला. दिग्गज कोच रमाकांत आचरेकर सरांनी दोघांना तावून-सलाखून तयार केले. दोघांनी तडाखेबंद करिअर सुरु केले. पण पुढे कांबळीच्या करिअरला घरघर लागली. तर सचिन हा क्रिकेटमधील देव झाला. या दोघांची अशी तुलना करणे अनेकांना आवडत नाहीत. त्यामागील कारणे आणि टीका सुद्धा अनेकांना आवडत नाही. पण गेल्या आठवड्यातील विनोद कांबळीची अवस्था अनेकांना धक्का देणारी ठरली. हा दिग्गज खेळाडू लवकरच त्याच्या अडचणीवर मात करेल अशी आशा अनेकांना वाटते.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.