LPG Cylinder Price: सिलिंडर महागलंय, त्रस्त आहात?, मग स्वस्तात गॅस बुक करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
एलपीजी खरेदी करताना वेगवेगळ्या माध्यमातून पैसे वाचवता येऊ शकतात. (indian oil cashback gas cylinder amazon pay)
मुंबई : पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या ( gas cylinder) किमतीही वाढल्यामळे सर्व स्तरातून रोष व्यक्त होतोय. घरगुती गॅस हा रोज लाहणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याही नसतो. याच कारणामुळे देशातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. मात्र, एकीकडे सिलिंडरच्या किमती वाढत असल्या तरी एलपीजी खरेदी करताना वेगवेगळ्या माध्यमातून पैसे वाचवता येऊ शकतात. (Indian Oil announces 50 rupees cashback on paying gas cylinder bill through Amazon Pay)
गॅस 35 दिवसांत 125 रुपयांनी महाग
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा भावही वाढतो आहे. मगील काही दिवसांचा विचार केला तर एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल तीन वेळा गॅसच्या किमती वाढल्या आहेत. या महिन्यात 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी वाढली. तर या महिन्याच्या सुरुवातीला गॅसची किंमत पुन्हा 25 रुपयांनी वाढवली गेली. त्यामुळे एकंदरीत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल 125 रुपयांनी वाढ झाली.
अशा प्रकारे वाचवा पैसे
मुंबई आणि दिल्लीमध्ये 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपयापर्यंत आलीये. तर चेन्नईमध्ये ही किंमत 835 रुपये आहे. कोलकात्यामध्ये गॅस सिलिंडर 845 रुपयांवर पोहोचले आहे. सामान्यत: गॅस सिलिंडर खरेदी करण्याठी कोणत्याही ऑफर नसतात. किंवा सिलिंडर कमी किमतीत खरेदी करण्यासाठी कोणतेही दुसरे पर्याय उपलब्ध नसतात. मात्र, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक मार्ग सांगितला आहे. कंपनीने सांगितलेली ट्रिक वापरुन गॅस खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते.
असे वाचवा 50 रुपये
गॅस खरेदी करताना 50 रुपये वाचवले जाऊ शकतात. त्यासाठी इंडियन ऑईलने खास ऑफर सांगितली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल म्हणजेच इंण्डेन या कंपनीचा गॅस खरेदी केल्यांतर 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतो. त्यासाठी एलपीजी सिलिंडरची बुकिंग अॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या माध्यमातून करावी लागेल. अॅमेझॉन पेच्या माध्यमातून गॅस बुकिंग केल्यानंतर अॅमेझॉनतर्फे 50 रुपये खात्यात कॅशबॅक म्हणून परत पाठवले जातील. म्हणजेच या मार्गाने 14.2 किलोचा गॅस सिलिंडर खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते.
दरम्यान, सध्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढलेल्या असल्यामुळे या कॅशबॅक ऑफरचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन इंडियन ऑईलने केले आहे.
इतर बातम्या :
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ
Drinking Water : जाणून घ्या आयुर्वेदात जेवताना पाणी पिण्याचा सल्ला का दिला जातो ?
(Indian Oil announces 50 rupees cashback on paying gas cylinder bill through Amazon Pay)