शेअर बाजाराची तुफान घौडदौड; उभारली रेकॉर्डची गुढी

Share Market : भारतीय शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार झाला. BSE Sensex ने मंगळवारी उच्चांकाचे तोरण लावले. नवीन विक्रमाची गुढी लावली. सेन्सेक्स 75,000 अंकांवर पोहचला नाही तर त्याने तो ओलांडला. तर दुसरीकडे NSE Nifty ने पण नवीन रेकॉर्ड नावावर केला आहे.

शेअर बाजाराची तुफान घौडदौड; उभारली रेकॉर्डची गुढी
शेअर बाजाराचा झंझावात, नवीन रेकॉर्डची उभारली गुढी, निफ्टीने पण बांधले तेजीचे तोरण
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 11:12 AM

देशात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. राजकीय पक्ष 400 पार, 180 पाराचे नारे देत आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावर पण दिसून येत आहे. शेअर बाजाराची जोरदार घौडदौड सुरु आहे. स्टॉक मार्केटने गेल्या काही दिवसांतील रेकॉर्ड इतिहास जमा केले आहे. बाजाराने नवीन विक्रमाची गुढी उभारली आहे. देशभरात नवीन वर्षाची विक्रम संवत्सर (हिंदु नववर्ष) उत्सवाची तयारी सुरु आहे. अशावेळी सेन्सेक्सने 75,000 अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. तर एनएसई निफ्टीने पण नवीन विक्रम नावावर कोरला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीचा नवीन रेकॉर्ड

  1. सकाळच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स 75,124.28 अंकावर उघडला. हा सर्वकालीन उच्चांक आहे. तर सोमवारी मुंबई निर्देशांक 74,742.50 अंकांवर बंद झाला होता. सकाळी विक्रम नावावर केल्यावर सेन्सेक्समध्ये किंचित घसरण दिसून आली. पण लवकरच बाजाराने जम बसवला. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांवर सेन्सेक्स 338 अंकांनी वधारला. तो 75,080.24 अंकावर ट्रेड करत होता.
  2. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक ‘निफ्टी 50’ ने पण मंगळवारी एक नवीन रेकॉर्ड केला. निफ्टी 22,765.10 अंकावर उघडला. सोमवारी निफ्टी 22,666.30 अंकावर बंद झाला होता. सकाळी 10 वाजता निफ्टीमध्ये 47 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी तेजीसह 22,713.35 अंकावर व्यापार करत होता.
  3. हे सुद्धा वाचा

निवडणूक हंगामाचा परिणाम

शेअर बाजाराने मोठी झेप घेतल्याने गुंतवणूकदारांना सत्तर हत्तीचं बळ संचारलं. सत्ताधारी पक्षाने लोकसभेत 400 हून अधिक जागा जिंकण्याचा हुंकार भरला आहे. तर आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षा त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करणार आहे. यामध्ये अनेक आश्वासने आणि घोषणांचा पाऊस असेल. शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ, महिलांसाठी विशेष योजना, पायाभूत सोयी-सुविधांविषयी मोठी आश्वासनं देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पण बाजारात दमखमने उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परदेशी पाहुण्यांनी पण मोठी गुंतवणूक केली आहे. देशात स्थिर सरकारकडे जनतेचा ओढा असल्याचे समोर येत आहे.

जागतिक संकेत पण पारड्यात

भारतीय शेअर बाजार सातत्याने तेजीकडे घौडदौड करत आहे. जागतिक समीकरणं आणि घडामोडी पण त्याला कारणीभूत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकने व्याज दरात कपातीची घोषणा केल्याने अनेक बाजारांना बळ मिळाले आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी स्थानिक बाजारात पैसा ओतला आहे. त्यामुळे बाजाराचा रथ घौडदौड करत आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....