Survey : या राज्यातील महिलाही नाहीत कमी, केवळ तीन दिवसात रिचवली इतक्या कोटींची दारू..
Survey : दारु गटविण्यात या राज्यातील महिलांनी अवघ्या तीन दिवसांत विक्रम केला आहे..
नवी दिल्ली : देशातील सर्वच राज्यात दारु विक्रीचे (Liquor Consumption) प्रमाण प्रचंड वाढले आहे. एका सर्वेक्षणात (Survey) या दिवाळी पूर्वीच्या तीन दिवसांची दारु विक्रीची आकडेवारी आश्चर्यचकित करणारी आहे. या सर्वेक्षणातील काही बाबी तर अत्यंत धक्कादायक आहेत.
दिल्लीत या दिवाळी पूर्वीच्या तीन दिवसांच्या दारु विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, दिल्लीकरांनी 100 कोटींहून अधिकची दारू रिचवली आहे. त्यात महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण वेगाने वाढल्याचे दिसून आले आहे.
दारु पिण्यातही महिला मागे नसल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. विक्री वाढण्यासाठी दारुवर देण्यात येणारी सवलत या विक्रीचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत सध्या एका दारुच्या बाटलीवर दुसरी दारुची बाटली मोफत देण्यात येत आहे.
दारुचे सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण समजण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला. सीएडीडी दिल्ली सर्वेक्षणात (CADD Delhi Survey) 5,000 महिलांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणात महिलांचे दारुचे व्यसन प्रचंड वाढल्याचे समोर आले.
महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आणि ते सातत्याने वाढ असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले. सहभागी 77 टक्के महिलांनी स्वस्तात दारु मिळत असल्याने दारुचे प्रमाण वाढल्याचे मान्य केले. ऑफर्समुळेच दारु विक्री वाढल्याचा दावा महिलांनी केला.
सर्वेक्षणात सहभागी 5,000 महिलांमधील 37.6 महिलांनी पूर्वी पेक्षा त्या दारुच्या जास्त आहारी गेल्याचे मान्य केले. 42.3 टक्के महिलांनी दारुचे प्रमाण जास्त वाढले नसल्याचे सांगितले.
कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर आणि जनजीवन सुरळीत सुरु झाल्याने दारु विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. पण पुरुषांइतके महिलांमध्ये दारुचे व्यसन नाही. पण त्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याबद्दल सर्वेक्षणात तपास करण्यात आला.
या सर्व्हेनुसार, वाढता ताणतणाव आणि चिंता यामुळे महिलांनी दारुकडे मोर्चा वळविला आहे. सर्वेक्षणातील आकड्यानुसार, तणाव वाढल्याने 45.7 टक्के महिला दारुच्या आहारी गेल्या आहेत. पण तणावाची कारणे मात्र समोर आलेली नाहीत.
तर 34.4 टक्के महिलांनी स्वस्तात दारु मिळत असल्याने त्यांना दारुची सवय लागल्याचे मान्य केले. 30.1 टक्के महिलांनी दिलेले कारण तर अगदीच विचित्र आहे. जीवनातील कंटाळा दूर करण्यासाठी त्या दारु पित असल्याचा दावा करण्यात आला आहे.