AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk: एलॉन मस्क यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तीव्र इच्छा, पण ‘या’ अडथळ्यांचा करावा लागेल सामना

ट्विटर वगळता जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ म्हणजे दिवास्वप्नच आहे, टेस्ला कार किंवा स्टारलिंकसारखी इतर प्रमुख उत्पादने भारतीय बाजारपेठेपासून कोसो दूर आहेत.

Elon Musk: एलॉन मस्क यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तीव्र इच्छा, पण 'या' अडथळ्यांचा करावा लागेल सामना
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:11 PM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचा ताबा घेणारे एलॉन मस्क यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ म्हणजे दिवास्वप्नच आहे, टेस्ला कार किंवा स्टारलिंकसारखी इतर प्रमुख उत्पादने भारतीय बाजारपेठेपासून कोसो दूर आहेत. अनेक दिवसांपासून, एलॉन मस्क (Elon Musk) टेस्ला (Tesla) आणि स्टारलिंकच्या (Starlink) माध्यमातून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु आतापर्यंत काहीही साध्य झाले नाही. मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि नियामक (regulatory) मुद्द्यांमुळे त्यांना कसे रोखले जात आहे याबद्दल सांगितले आहे. या जागतिक अब्जाधीशांनी आपल्या भारतातील योजना (India plans) त्यांच्यासोबत शेअर कराव्यात, असे आवाहनही भारतीय नेटिझन्सनी केले आहे. पण ट्विटरच्या माध्यमातून मस्क यांचं एखादं उत्पादन भारतात इतक्या लवकर दाखल होईल, हे कुणाला माहीत होतं.

खरं सांगायचं तर भारतीय नेटिझन्सचा मुख्य आधार असलेले ट्विटर आधीपासूनच भारतात होते. आता ट्विटर मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. मालकीची ही तांत्रिक बाब पूर्ण झाली आहे. याला आता इतके महत्त्व का आले आहे? कारण, विनासायास मस्क यांचे एक उत्पादन भारतात अगोदरच आले आहे. तर या घडामोडींमुळे टेस्ला आणि स्टारलिंक या दोन्ही कंपन्या नियामक मुद्द्यांकडे डोळे लावून बसल्या आहेत, नियमांच्या आडकाठीमुळे त्यांचा बाजारपेठेतील प्रवेश लांबणीवर पडला आहे, ही बाब भारतीय बाजारपेठेसाठी, उद्योगांसाठी आणि वापरकर्त्यांसाठी निराशाजनक आहे. टेस्ला देशात कधी येणार, असा प्रश्न भारतीय नेटकरी मस्क यांना विचारत आहेत. परंतु बहुतेकांना माहित आहे की, टेस्ला वाहनांवरील आयात शुल्क हे देशात प्रवेश करण्यासाठी अडथळा म्हणून काम करत आहे.

मस्क यांनी ट्विटरवर (Twitter) म्हटले होते की, त्यांना भारतात यायचे आहे,पण भारताचे आयात शुल्क जगात सर्वाधिक आहे. स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताने जाणूनबुजून आयात शुल्क जास्त ठेवले आहे. शिवाय, भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) इतर फायदे आहेत, ज्यात अनेक राज्यांमध्ये कमी जीएसटी दर (5 टक्के), आयकर कपात आणि शून्य रस्ते कराचा समावेश आहे.

एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत (Elon Musk Buys Twitter) घेतलं आहे. त्यासाठी त्यांनी कंपनीला 44 अब्ज डॉलरची ऑफर दिली होती, जी कंपनीने स्वीकारली. ट्विटरची इक्विटी खरेदी करण्यासाठी 21 अब्ज डॉलर रोख देणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. पण आता उरलेले पैसे तो कुठे घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index ) त्यांची एकूण संपत्ती 257 अब्ज डॉलर इतकी आहे यात शंका नाही. पण ब्लूमबर्गचा अंदाज आहे की मस्ककडे केवळ 3 अब्ज डॉलर्सची रोकड आणि काही विक्री योग्य मालमत्ता (Liquid Assets)आहेत.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.