Indo-US Trade : आता चीन नाही तर भारत अमेरिकेचा नंबर एकचा मित्र; द्विपक्षीय व्यापारात चीनला टाकले मागे
अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापारात चीनला मागे टाकत भारत हा अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या निर्यात मूल्यात मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
नवी दिल्ली : भारत (India) आणि अमेरिका (America) यांच्यामधील मैत्रीच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. सध्या अमेरिका चीनपेक्षा भारताला जास्त महत्त्व देत आहे. विशेष करून आर्थिक (Economy) मोर्चावर अमेरिका आणि भारत गेल्या काही वर्षांमध्ये एकोंमेकांचे मजबूत भागिदार बनले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात अमेरिकेने चीनपेक्षा अधिक व्यापार भारतासोबत केला आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकेडवारीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षात भारत हा चीनला मागे टाकत अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. वाणिज्य मंत्राययाने प्रसिद्ध केलेल्या आकेडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात वर्ष 2021-22 मध्ये अमेरिका आणि भारताने द्वपक्षीय व्यापाराची मर्यादा वाढून ती 119.42 अब्ज डॉलवर नेली आहे. त्याच्या मागील आर्थिक वर्षात 2020- 21 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापारांचे मुल्य 86.4 अब्ज डॉलर इतके होते.
वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी काय सांगते?
वाणिज्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये भारताने अमेरिकेला तब्बल 76.11 अब्ज डॉलरच्या विविध वस्तूंची निर्यात केली. त्याच्या मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2020- 21 मध्ये निर्यातीचे हेच प्रमाण 51.62 अब्ज डॉलर इतके होते. दुसरीकडे भारताने अमेरिकेकडून 43.31 अब्ज डॉलरची आयात केली आहे. त्याच्या मागील वर्षात हेच प्रमाण 29 अब्ज डॉलर एवढे होते. भारत आणि चीनबाबत बोलायचे झाल्यास गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि चीनमधील द्वपक्षीय व्यापर 115.42 अब्ज डॉलर इतका राहिला. त्याच्या मागील आर्थिक वर्षात भारत आणि चीनमधील व्यापर 86.4 अब्ज डॉलर इतका होता. गेल्या आर्थिक वर्षात भारताचे चीनसोबतचे निर्यात मूल्य 21.25 अब्ज डॉलर इतके होते.
अमेरिका चीनमधील आयात कमी करणार?
एकीकडे चीनसोबतच्या द्विपक्षीय व्यापारात गेल्या आर्थिक वर्षात भारताचे निर्यात मूल्य वाढले आहे. भारताने गेल्या आर्थिक वर्षामध्ये चीनला 21.25 अब्ज डॉलरच्या विविध वस्तू निर्यात केल्या. मात्र त्याचबरोबत आयात मूल्यात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने चीनमधून तब्बल 94.16 डॉलरची आयात केली आहे. त्याच्या मागील आर्थिक वर्षात हेचप्रमाण 65.21 अब्ज डॉलर इतके होते. आकडेवारीवर नजर टाकल्यास तसेच तज्ज्ञांचे मत लक्षात घेतल्यास येत्या काळात भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिकेमधील व्यापार आणखी वाढू शकतो. तर अमेरिका चीनमधून आयात करणाऱ्या वस्तूंमध्ये कपात करू शकते. त्याचा फायदा हा भारताला होऊ शकतो.