AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Semiconductor : सेमीकंडक्टर उत्पादनात चीन नाही, पुढे राहिल भारत! या कंपन्या मैदानात,मिळणार रोजगार

Semiconductor : सेमीकंडक्टर उत्पादनात चीन, तैवान आता पुढे राहणार नाहीत तर भारताचा लवकरच दबदबा होईल. गुजरातमध्ये सेमीकॉन इंडिया 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून ब्लू प्रिंट समोर येईल.

Semiconductor : सेमीकंडक्टर उत्पादनात चीन नाही, पुढे राहिल भारत! या कंपन्या मैदानात,मिळणार रोजगार
| Updated on: Jul 28, 2023 | 4:29 PM
Share

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : सेमीकंडक्टर उत्पादनात (Semiconductor Manufacturing) भारत आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. हे केंद्र सरकारचे स्वप्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यासाठी भारत सरकार सातत्याने पाठपुरावा, सुविधा देत आहे. जागतिक कंपन्यांनी त्यांचा मोर्चा भारताकडे वळविला आहे. गुजरातमध्ये दोन दिवसांसाठी सेमीकॉन इंडिया 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात चीन, तैवान आता पुढे राहणार नाहीत तर भारताचा लवकरच दबदबा होईल. त्यातून सेमीकंडक्टर उत्पादनाची ब्लू प्रिंट समोर येईल. या कंपनीने त्यासाठी 32,88,64,02,800 रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तर वेदांता, फॉक्सकॉन, मायक्रॉन यासह इतर अनेक कंपन्या भारतीय बाजारात उतरल्या आहेत. त्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

एएमडीची मोठी गुंतवणूक

अमेरिकेतील सेमीकंडक्टर कंपनी एडवान्स्ड मायक्रो डिव्हाईसेज (AMD) भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी भारतात 2028 पर्यंत 400 दशलक्ष डॉलर (32,88,64,02,800 रुपये) गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक पाच वर्षांत करण्यात येईल.

बेंगळुरुत टेक हब

एएमडी कंपनी बेंगळुरु शहरात टेक हब तयार करेल. याठिकाणी विविध डिझाईन सेंटर तयार करण्यात येईल. शुक्रवारी गुजरातमधील सेमीकंडक्टर परिषदेत (Annual Semiconductor Conference) कंपनीने ही घोषणा केली. या कार्यक्रमात फॉक्सकॉनचे (Foxconn) अध्यक्ष यंग लियू आणि मायक्रॉनचे (Micron) सीईओ संजय मेहरोत्रा हे सहभागी होते.

या देशांचा दबदबा

चिप आणि डिस्प्ले उत्पादनात सध्या तैवान, चीन-हाँगकाँग, दक्षिण कोरिया यांचा दबदबा आहे. एकट्या तैवानचा सेमीकंडक्टर उत्पादनात 92 टक्के वाटा आहे. आता भारतात सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन सुरु होणार आहे. त्यामुळे या देशातील बाजारपेठेला धक्का बसणार आहे.

इतकी मोठी बाजारपेठ

एका रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत भारत सेमीकंडक्टर आणि चिपची 17 टक्के गरज देशातूनच पूर्ण करेल. त्यामुळे आयातीवरचा खर्च कमी होईल. इंडिया सेमीकंडक्टर मार्केट रिपोर्ट 2019-2026 नुसार, भारतात 300 अरब डॉलरची बाजारपेठ उभी राहील. इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का बसेल. त्यामुळे येत्या 5 वर्षातच त्यांना भारताशी स्पर्धा करावी लागणार आहे.

नोकरीची संधी

केंद्र सरकार चिप मॅन्युफॅक्चरिंगवर अधिक लक्ष देत आहे. मोदी सरकार भारताला चिप सेंटर करणार आहे. एएमडी कंपनीच्या प्रकल्पात 3000 अभियंत्यांना नोकरी मिळेल. एएमडीचे मार्क पेपरमास्टर यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. 5 लाख चौरस फुटात कंपनीचा प्रकल्प असेल. या कंपनीचा देशात यापूर्वीच्या प्लँटमध्ये 6,500 हून अधिक कर्मचारी आहेत.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.