Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!

Donation | अनेक दिग्गज भारतीय उद्योजक दान करतात. काही जणांनी शैक्षणिक संस्था पण सुरु केल्या आहेत. परोपकारी आणि गरजूंच्या हितासाठी त्यांची मदत कामी येते. काहींनी मोठ-मोठ्या ट्रस्ट स्थापन केल्या आहेत. या यादीत आता एका लेखिकेचे नाव जोडल्या गेले आहेत. एका लेखिकेने कोट्यवधी रुपये दान केले आहेत.

Donation | 19 वर्षी झाले लग्न, मीडियापासून कोसो दूर, दान केले 110,00,00,000 रुपये!
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 2:29 PM

नवी दिल्ली | 17 February 2024 : शिव नाडर, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, रतन टाटा हे दानशूरांमधील मोठे नाव आहे. दानशूरांच्या यादीत हुरुन इंडियामध्ये एका दाम्पत्याने पण नाव कोरले आहे. सुष्मिता आणि सुब्रतो बागची असे त्यांचे नाव आहे. एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलेंथ्रॉपिस्ट यादी 2023 अनुसार, सुष्मिता और सुब्रतो बागची हे दाम्पत्य भारतातील दानशुरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 1100000000 रुपयांहून अधिक रक्कम दान केली होती. तर सुष्मिता बागची यांनी एकट्याने गेल्य वर्षी 2130000000 रुपये दान केले होते. इतके मोठे दान केले असताना पण त्या प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतात.

ओडिशामध्ये झाला जन्म

सुष्मिता बागची यांचा जन्म कटकमध्ये झाला. त्या प्रसिद्ध ओडिशा लेखिका शकुंतला पांडा यांची कन्या आहेत. त्यांनी आईच्याच पावलांवर पाऊल टाकलं आहे. सुष्मिता बागची पण एक प्रसिद्ध उडिया लेखिका झाल्या. त्यांचे महिलांसाठीचे मासिक सुचरिता हे लोकप्रिय आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठात त्या व्याख्याता, लेक्चरर म्हणून रुजू झाल्या. त्या अवघ्या 15 वर्षांच्या असताना त्यांची पती सुब्रतो बागची यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चार वर्षांनी दोघांनी लग्न केले.

हे सुद्धा वाचा

आईकडून मिळली प्रेरणा

  • सुष्मिता यांना आईकडूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. माईंडट्रीची सहसंस्थपक आणि एक समाजसुधारक म्हणून सुष्मिता बागची यांनी ओळख निर्माण केली. तशी त्यांनी लेखिका म्हणून पण ओळख निर्माण केली. त्यांनी प्रवास वर्णन, लघुकथा, विविध संग्रह, इंग्रजी आणि ओडिशा भाषेत पाच कादंबरी लिहिल्या.
  • मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारी एखादी व्यक्ती अथवा कुटुंब पहिल्या इंग्रजी कादंबरीचे मुख्य पात्र, एखाद्याला मानसोपचारतज्ज्ञ विश्वासार्ह आणि ओळखण्या योग्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बागची यांच्या लिखाणाची अनेकांना तोंडभर स्तूती केली आहे. कौतुक केले आहे. बागची यांना त्यांच्या सामाजिक काम, लिखाणाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2010 मध्ये अर्न्स्ट अँड यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इअर अवॉर्ड आणि 2013 मध्ये फोर्ब्स एशियातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.