Inflation Calculator: तुम्ही बचत करत असलेल्या पैशांची 10 वर्षानंतर किंमत किती असेल?

महागाई सतत वाढत आहे. ज्याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये असलेली किंमत आज कमी झाली आहे. त्याचप्रमाणे पुढील 10 वर्षानंतर कोटी रुपयांचे मूल्यही कमी होईल. येत्या 10-20 वर्षात 1 कोटी रुपयांची किंमत काय असेल हे आम्ही या लेखात सांगणार आहोत.

Inflation Calculator: तुम्ही बचत करत असलेल्या पैशांची 10 वर्षानंतर किंमत किती असेल?
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 5:42 PM

महागाईचा फटका हा सर्वच स्तरातील लोकांना बसत असतो. भविष्यात तो कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आपण नोकरीबरोबरच गुंतवणूकही करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करत आहात ती रक्कम जेव्हा तुम्हाला मिळेल त्यानंतर त्याचे मूल्य किती असेल? आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. पण अनेक गुंतवणूक योजना 10-15 वर्षांनी मॅच्युअर्ड होतात. जेव्हा 10-15 वर्षांनी परताव्याची रक्कम कळते तेव्हा कळते की त्याचे मूल्य आजच्या तुलनेत कमीच आहे.

पैशाचे मूल्य का कमी होते?

दरवर्षी महागाई दर वाढत चालला आहे.  त्यामुळे काळाबरोबर रुपयाचे मूल्य कमी होत जाते. आज तेल 150 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. 5 वर्षांपूर्वी त्याची किंमत 70 रुपये होती. पुढील 10 वर्षांनी तेलाचे दर प्रतिलिटर 300 रुपये होऊ शकतात. अशाप्रकारे सोने, चांदी, घरे यासारख्या इतर वस्तूंचे देखील असेत असते. महागाई कितीही असली तरी ग्राहक या सर्व वस्तू खरेदी करणारच असतात. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत जाते.

उदाहरणार्थ, जिथे 10 वर्षांपूर्वी तुम्ही 100 रुपयांना 3-4 वस्तू खरेदी करू शकत होतो. आता मात्र 100 रुपयांना फक्त एकच वस्तू खरेदी करता येते. महागाई वाढली तर कदाचित 10 वर्षानंतर 100 रुपयांना एकही वस्तू मिळणार नाही. अशा प्रकारे 100 रुपयांचे मूल्य कमी होत जाईल.

जर आपण महागाई दर 6 टक्के गृहीत धरला तर 10 वर्षानंतर 1 कोटी रुपयांचे मूल्य अंदाजे 55.84 लाख रुपये होईल. त्याचप्रमाणे, 20 वर्षांनंतर 1 कोटी रुपयाची किंमत अंदाजे 31 लाख रुपये होईल. याचा अर्थ कोट्यवधी रुपयांचे मूल्य दर दशकात घसरत राहील.

महागाईचा परिणाम बचतीवर होतो

तुमच्या बचत खात्यात आज समजा 1 कोटी रुपये जमा आहेत, ज्याला तुम्ही आज खूप मोठी गोष्ट मानत आहात. परंतु जेव्हा हिशोबानुसार 10 वर्षांनंतर या 1 कोटी रुपयांची किंमत सुमारे 55 लाख रुपये होईल. आता रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने भविष्यातील गरजा भागवण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही.

उदाहरणार्थ, आज तुम्ही 15 वर्षांपूर्वी जेवढ्या पैशात किराणा सामान खरेदी करायचो त्याच रकमेत खरेदी करू शकता? उत्तर आहे, नाही. आजच्या आणि 15 वर्षांपूर्वीच्या खर्चातील फरक स्पष्टपणे दर्शवतो की महागाईमुळे पैशाचे मूल्य कमी होते. आता पैशाचे मूल्य कमी होत असताना त्याचा परिणाम बचतीवरही होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.