Inflation : नवीन वर्षात महागाई नाही खाणार जीव, EMI ही गेअर बदलणार..

Inflation : नवीन वर्षात महागाईचा सूर नरमणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत..

Inflation : नवीन वर्षात महागाई नाही खाणार जीव, EMI ही गेअर बदलणार..
महागाईच्या आघाडीवर दिलासाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 9:14 PM

नवी दिल्ली : नवीन वर्ष, 2023 यायला फारसा अवधी उरला नाही. नवीन वर्ष सर्वसामान्यांना दिलासा देणारं आहे. महागाईच्या (Inflation) आघाडीवर मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन वर्षात महागाई कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेचे (World Bank) अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांच्या मते, किरकोळ महागाईचा दर पुढील आर्थिक वर्षात (Fiscal Year) 2023-24 मध्ये घटेल. महागाई दर कमी होऊन तो 5.1 टक्के होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांची महाग ईएमआयपासून (EMI) सूटका होऊ शकते.

महागाई दर घसरल्याचा फायदा ग्राहकांना मिळेल. आरबीआयच्या पतधोरणाच्या मर्यादेत म्हणजे 2 ते 6 टक्क्यांच्या घरात महागाई दर असेल. खाद्यान्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. सध्या ऑक्टोबर महिन्याचे जे आकडे आले आहे, त्यानुसार, किरकोळ महागाईचा दर 6.7 टक्के आहे.

एप्रिल 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यानंतर RBI ने सलग व्याज दर वाढविला आहे. सलग चार पतधोरण समितीच्या बैठकांमध्ये हा दर वाढलेला आहे. आरबीआय रेपो दर 4 टक्क्यांहून 5.90 टक्क्यांवर पोहचला आहे.

हे सुद्धा वाचा

रेपो दरातील वाढीमुले बँकांचे गृहकर्ज आणि इतर कर्जावरील व्याज दर वाढले आहेत. गृहकर्ज ग्राहकांच्या ईएमआयमध्ये तर आणखी वाढ झाली आहे. महागाईने मेटाकुटीला आलेल्या कर्जदारांना ईएमआय वाढल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

वाढत्या ईएमआयमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. त्यांचे बजेट कोलमडले. पण आता जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, महागाई कमी होऊन ती 5.1 टक्क्यांवर येऊ शकते. त्यामुळे रेपो दराच्या वाढीला ब्रेक लागेल. रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय कमी होईल.

RBI चे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पुढील वर्षी महागाई कमी होण्याचा दावा केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही पुढील वर्षी महागाई कमी होण्याचे संकेत दिले आहे. 7 डिसेंबर रोजी आरबीआय रेपो दराविषयी निर्णय घेईल. त्याआधारे महागाईच्या आघाडीवर आरबीआयचे धोरण स्पष्ट होईल.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.