‘पॉलिसी’ काढताना विमा कंपन्या फिरतात मागे… रिटर्न्स देताना मात्र, ज्येष्ठ नागरिकांचा होतो मानसिक छळ; सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती!

आयुष्यभर पै-पै गोळा करून विम्याचे हप्ते नियमित भरल्यावर आयुष्याच्या उतारवयात गरज पडल्यावर तोच पैसा मिळविण्यास ज्येष्ठ नागरिकांना विमा कंपन्यांचे उंबरे झिजवावे लागत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

‘पॉलिसी’ काढताना विमा कंपन्या फिरतात मागे... रिटर्न्स देताना मात्र, ज्येष्ठ नागरिकांचा होतो मानसिक छळ; सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती!
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:06 PM

देशातील ज्येष्ठ नागरिकांना विम्याचा दावा (Insurance claim) मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. एका सर्वेक्षणात आढळून आले आहे की, विमा कंपन्या पॉलिसी देण्यास खूप धावपळ करतात मात्र, त्याच पॉलिसीचा परतावा देण्यास ज्येष्ठ नागरिकांना (To senior citizens) खूप उशीर लावतात. या ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा खूप महाग दराने विमा दिला जातो. विमा ब्रोकर्स SecureNow ने एका सर्वेक्षणात म्हटले आहे की, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना विमा दावा लवकर मिळतो. पण यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी एक आठवडा अतिरिक्त वेळ (Extra time) लागतो. हे सर्वेक्षण आरोग्य विमा घेणाऱ्या 1,250 ग्राहकांमध्ये करण्यात आले. यामध्ये 576 ज्येष्ठ नागरिक होते. सर्वसामान्यपणे 23.2 दिवसात विमा क्लेम मिळत असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. परंतु याच तुलनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ते मिळण्यासाठी 28 दिवस लागतात.

दावा 28 दिवसात प्राप्त होतो

सर्वसामान्यांना 23.2 दिवसांत विमा क्लेम मिळत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ते मिळण्यासाठी 28 दिवस लागतात. ज्येष्ठ नागरिकांना दावा जलदगतीने मिळावा यासाठी विमा कंपन्यांकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही.

आजारांचे निदान होण्यात अयशस्वी

ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा दावा मिळण्यास विलंब होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कारण ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विमा कंपनीला लवकर कळवू शकत नाहीत. तसेच, ते बराच काळ रुग्णालयात राहतात. याशिवाय उपचाराचा खर्चही जास्त असतो. अशा स्थितीत विमा कंपन्यांना हे सर्व निकाली काढण्यासाठी वेळ लागतो.

हे सुद्धा वाचा

6 पट जास्त प्रीमिअम

जर एखाद्या 30 वर्षांच्या व्यक्तीने काही आरोग्य विमा खरेदी केला आणि त्याचा प्रीमिअम 10 हजार 365 रुपये असेल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच प्रीमिअम 31 हजार 905 रुपये होईल. 45 वर्षांच्या व्यक्तीसाठी हा प्रीमिअम 15 हजार 239 रुपये होतो. 75 वर्षांच्या व्यक्तीला यासाठी 66 हजार 368 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य विमा उत्पादन निवडणेही अवघड काम आहे. अतिसार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे दावे मिळण्यास अधिक विलंब होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.