Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?
Omicron फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहे. आता टर्म इन्शुरन्स (Insurance) घेणं जास्त अवघड होणाराय. मोठ्या खाजगी जीवन विमा कंपन्या त्यांच्या मुदतीच्या विमा प्रीमियम (Premium) दरात बदल करणार आहेत.
मुंबई : Omicron फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या खिशावरही परिणाम करणार आहे. आता टर्म इन्शुरन्स (Insurance) घेणं जास्त अवघड होणाराय. मोठ्या खाजगी जीवन विमा कंपन्या त्यांच्या मुदतीच्या विमा प्रीमियम (Premium) दरात बदल करणार आहेत. चालू आर्थिक वर्षातल्या आयुर्विमा उद्योगातल्या किंमतीतल्या वाढीची ही दुसरी फेरी आहे.
25 ते 45 टक्क्यांनी वाढ? शुद्ध संरक्षण म्हटले जाणारे मुदत विम्याचे हप्ता (Premium) पुन्हा एकदा वाढणार आहेत. यावेळीहा प्रीमियम 25 ते 45 टक्क्यांनी वाढू शकतो. या उद्योगाविषयीचे जाणकार म्हणतात, की जागतिक बाजारपेठेत पुनर्विम्याचे दर लक्षणीय वाढले आहेत, त्यामुळे आता भारतातही तेच होणार आहे.
का आणि किती वाढेल किंमत? काही आयुर्विमा कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातच त्यांच्या प्रीमियममध्ये वाढ केली होती. कोविड-19मुळे मृत्यूचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांनी प्रीमियम वाढवला होता. यावेळीही कारण तेच सांगितलं जात आहे.
जास्त पगार असलेल्यांसाठीच वितरकांच्या म्हणण्यानुसार, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि HDFC लाइफ इन्शुरन्सनं चौथ्या तिमाहीत सुधारणेच्या शक्यतेबद्दल माहिती दिली. एक बदल असा झालाय, की विमा कंपन्या आता जास्त किंमतीच्या पॉलिसी फक्त पदवीधारकांनाच देणार आहेत किंवा ज्यांचा पगार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
विकसित देशांच्या तुलनेत दर कमी? तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की चांगल्या आरोग्य सुविधा आणि उच्च आयुर्मान असलेल्या काही विकसित देशांच्या तुलनेत भारतात विमा संरक्षणाच्या किंमती खूपच कमी आहेत. जागतिक बाजारपेठेत पुनर्विम्याच्या दरांमध्ये जेव्हा जेव्हा सुधारणा होते तेव्हा इथंही दर वाढवावे लागतात.