Insurance : विमा होणार स्वस्त, मिळणार जोरदार फायदा..बाजारात नवीन विमा कंपन्यांचा पोळा फुटणार..

Insurance : विमा कंपन्यांचा देशात सुकाळ येणार आहे. त्याचा ग्राहकांना ही फायदा होणार आहे..

Insurance : विमा होणार स्वस्त, मिळणार जोरदार फायदा..बाजारात नवीन विमा कंपन्यांचा पोळा फुटणार..
विमा क्षेत्रात सवलतींची लाट?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 11:54 PM

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात ग्राहकांना (Consumers) जोरदार विमा उत्पादने आणि सेवा (Insurance Product and Services) मिळणार आहे. ग्राहकांना स्वस्त विमा तर मिळेलच पण त्यावर सवलतींचा पाऊसही पडेल. तसेच विम्यासाठी आणि दाव्यांचा निपटाऱ्यांसाठी ग्राहकांना आता जास्त काळ वाट पहावी लागणार नाही. नवीन विमा कंपन्या (New Insurance Companies) त्यांना नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध करुन देतील.

बाजारात आता 18 नवीन विमा कंपन्या विमा सेवा देण्यासाठी येत आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास आयोगाचे (IRDAI) अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखातीत याविषयीची माहिती दिली.

IRDAI चे अध्यक्ष पांडा यांच्या मते, विमा क्षेत्रात प्राधिकरण संयुक्त परवाना आणण्यासाठी तयारी करत आहे. परवान्यामुळे जीवन विमा आणि सार्वजनिक विमा बाजारात काम करणाऱ्या कंपन्यांना परवाना मिळविताना अडचण येणार नाही.

हे सुद्धा वाचा

देबाशीष पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कंपनीला यापूर्वी 2017 मध्ये मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी प्राधिकरणाने Kshema जनरल इन्शुरन्स कंपनीला मंजूर दिली आहे.

यासोबतच अन्य एक कंपनीही विमा क्षेत्रात उतरु इच्छित आहे. पण याविषयीचा प्रस्ताव अद्याप बोर्डासमोर आलेला नाही. एकदा हा प्रस्ताव बोर्डासमोर आला की, त्याला मंजूरी देता येईल. तर विमा क्षेत्रात दाखल होण्यासाठी आता एकूण 18 कंपन्या पाईपलाईमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) भारतीय विमा क्षेत्राच्या विकासासाठी काही सूनचा केल्या आहेत. त्यानुसार, केंद्र सरकारने 100 कोटी रुपायांची कमीत कमी रक्कम असण्याची अट शिथिल करण्याची विनंती केली आहे.

यासोबतच विमा कंपनीला व्यावसायिक योजनांवर आधारीत विमा रक्कम निश्चित करु देण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे विमा क्षेत्रात लहान, विशेष आणि चांगल्या सेवा देणाऱ्या विमा कंपन्या येतील.

त्यामुळे देशात विमा क्षेत्राचा परिघ वाढेल. ग्राहक जास्तीत जास्त विमा खरेदी करतील. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमा कंपन्या आकर्षक योजना आणतील. त्यामुळे विमा स्वस्त मिळेल तसेच त्यावर सवलती ही मिळण्याची शक्यता आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.