LIC च्या ‘या’ योजनेत दररोज 333 रुपये गुंतवा, पॉलिसी कालावधी संपल्यावर 70 लाख मिळवण्याची संधी

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी त्यांच्या ग्राहकांच्या अनेक योजना राबवत असते. एलआयसीची LIC SIIP एक योजना आहे. LIC SIIP

LIC च्या 'या' योजनेत दररोज 333 रुपये गुंतवा, पॉलिसी कालावधी संपल्यावर 70 लाख मिळवण्याची संधी
lic
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 5:31 PM

नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी त्यांच्या ग्राहकांच्या अनेक योजना राबवत असते. एलआयसीची LIC SIIP एक योजना आहे. ही योजना विमा योजनेसारखं काम करते. मॅच्युरिटीनंतर मोठा परतावा देखील ग्राहकांना मिळतो. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव LIC SIIP असून त्याचा टेबल नंबर 852 आहे. यामध्ये तुमच्या प्रीमियमचा काही हिस्सा जीवन विम्याच्या रूपात जमा करता आणि उर्वरित भाग गुंतवणूकीत जमा केला जातो. गुंतवणुकीसाठी एलआयसी आपले पैसे डेट फंड, इक्विटी फंड आणि बॅलन्स फंडमध्ये गुंतवते. एलआयसीची ही योजना घेण्यासाठी विमा धारकाचं वय किमान 90 दिवस ते 65 वर्षे आहे. तर , पॉलिसीची किमान मुदत 10 वर्षे आणि कमाल पॉलिसीची मुदत 25 वर्षे असेल. (Invest 333 per day in LIC SIIP and get 70 lakhs at maturity LIC SIIP scheme details)

333 रुपयांची गुंतवणूक करु शकता

एलआयसीच्या या योजनेसाठी किमान प्रीमियम मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मासिक 4000 हजार रुपये प्रीमियम जमा करता येतो. तर, तिमाहीसाठी 12 हजार रुपये जमा करता येतात. सहा महिन्यांचा प्रीमियम असेल तर 22 हजार आणि वार्षिक गुंतवणूक करणार असेल तर 40 हजार रुपये जमा करता येतात. त्याने स्वत: साठी निवडलेला गुंतवणूकीचा फंड जर वर्षाकाठी 4 टक्के परतावा देत असेल तर त्याला मॅच्युरिटी म्हणून 4004293 रुपये मिळेल. जर हा फंड वार्षिक आधारावर 8 टक्के परतावा देत असेल तर तुम्हाला 6917669 रुपये मिळतील. गुंतवणूकदार 25 वर्षांत तो एकूण 30 लाख रुपये जमा करेल.

जर तुम्ही तुच्या मुलाच्या नावे पॉलिसी घेतल्यास, त्याच्या वयानुसार विमा संरक्षण मिळते. जर आपल्या मुलाचे वय 8 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपण पॉलिसी घेताच रिस्क कवरेज सुरू होते. जर त्याचे वय 8 वर्षांपेक्षा कमी असेल तर रिस्क कव्हरेज 8 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा दोन पॉलिसी वर्षे पूर्ण होईपर्यंत जे आधी असेल त्यावेळी सुरु होईल. एलआयसीचा युलिप प्लान आहे या योजनेतील रकमेला म्युच्युअल फंडसारखं गुंतवलं जातं. एलआयसीकडून विमाधारकांना परतावा दिला जातो.

करसवलतीचा लाभ

एखाद्या विमाधारकाचा विमा योजनेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास. वारसदारांना मूळ विमा संरक्षण किंवा फंड रक्कम जी अधिक असेल ती दिली जाते. पॉलिसी कालावधी पूर्ण होईपर्यंत विमा धारक जिवंत असेल तर त्याला सर्व रक्कम मिळते. यामधील गुंतवणुकीवर 80 सी नुसार कर सवलत मिळते.

संबंधित बातम्या:

6 कोटी नोकरदारांना ईपीएफओचा दिलासा, नोकरी गमावली असली तरी PF खात्यातून 75 टक्के रक्कम काढण्याची संधी

Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?

(Invest 333 per day in LIC SIIP and get 70 lakhs at maturity LIC SIIP scheme details)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.