LIC Jeevan Labh | एलआयसीची भन्नाट योजना! रोज गुंतवा 238 रुपये, मिळवा 54 लाखांचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC Jeevan Labh Scheme : एलआयसीच्या या भन्नाट योजनेत तुम्ही रोज 238 रुपये गुंतवले तर तुम्हाला 54 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जाणून घेऊयात या योजनेबद्दल

LIC Jeevan Labh | एलआयसीची भन्नाट योजना! रोज गुंतवा 238 रुपये, मिळवा 54 लाखांचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती
एलआयसी जीवन 'लाभ'Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:00 AM

LIC Jeevan Labh News : भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) एकाहून अनेक भन्नाट योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक लाभासोबत व्यक्तीचा विमा ही उतरविल्या जातो. अशीच एक भन्नाट योजना आहे जीवन लाभ. या योजनेत लाभार्थ्याला कमी रक्कम भरुन मोठा परतावा मिळू शकता. एलआयसीची जीवन लाभ योजना (LIC Jeevan Labh Scheme) ही नाममात्र हप्ता भरणा-या ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही योजना बचतीसह तुम्हाला संरक्षणाची हमी (Insurance with savings) ही देते. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना एक मोठा दिलासा या योजनेत मिळतो. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी फायदाआणि मृत्यू नंतर कुटुंबियांना होणारे लाभ या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.  LIC ने ही योजना 2020 मध्ये सुरु केली होती. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आणि त्याचे सर्व हप्ते भरल्या गेले असतील तर त्याच्या वारसाला या योजनेचे सर्व लाभ देण्यात येतात. तर व्यक्ती जीवंत असेल, त्याने पूर्ण हप्ते भरले असतील तर त्याला कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकरक्कमी फायदा मिळतो.

योजनेची वैशिष्ट्ये

जीवन लाभ पॉलिसीमध्ये किमान दोन लाख रुपये गुंतवू शकता. कमाल किती रक्कम गुंतवायची यावर मर्यादा नाही. या योजनेत मुदतपूर्तीसाठी वेगवेगळे कालावधी निश्चित करण्यात आले आहेत. ही पॉलिसी 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे 8 वर्षे ते 59 वर्षे मुदतीसाठी घेता येते. या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर हप्ते भरता येतात.

योजनेसाठी रायडर ही उपलब्ध

अपघाती मृत्यू सोबतच अपंगत्व लाभ रायडर, एलआयसीचा नवीन टर्म अॅश्युरन्स रायडर, एलआयसीचा नवीन गंभीर आजार लाभ रायडर, एलआयसीचा प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर हे या योजनेत घेता येतात. मॅच्युरिटी फायदासह इतर रायडरचे फायदे ग्राहकाला मिळविता येतात.

हे सुद्धा वाचा

योजनेसाठी पेमेंटचे 4 पर्याय

या योजनेसाठी 4 पेमेंट पर्याय आहेत. मासिकासाठी किमान हप्त्याची रक्कम ₹5000 असेल. तिमाहीसाठी किमान हप्त्याची रक्कम ₹15,000 असेल आणि सहामाहीसाठी किमान हप्ता रक्कम ₹25,000 असेल. त्याच वेळी, वार्षिक हप्त्याची रक्कम ₹50,000 असेल.

फायद्याचे गणित

समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि तुम्ही 25 वर्षांची मुदत निवडली. योजनेनुसार, तुम्हाला मूळ विमा रक्कम म्हणून 20 लाख रुपयांची सम आश्युर्ड योजना निवडावी लागेल. जीएसटी वगळून त्यासाठी तुम्हाला वार्षिक 86954 रुपये जमा करावे लागतील. म्हणजे रोज 238 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 50 व्या वर्षी तुम्हाला जीवन विमा लाभातंर्गत एकूण परिपक्व रक्कम म्हणून 54.50 लाख रुपयांची रक्कम मिळेल.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.