मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दररोज 7 रुपये गुंतवा, दरमहा 5000 कमवा, नेमकी योजना काय?

पीएफआरडीएच्या मते, अटल पेन्शन योजनेतील (APY) ग्राहकांच्या संख्येनं 25 ऑगस्टपर्यंत 3.30 कोटींचा टप्पा ओलांडला. या योजनेअंतर्गत 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये पेन्शन 60 वर्षांच्या वयानंतर उपलब्ध आहे. बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेले 18 ते 40 वर्षे वयाचे कोणतेही नागरिक या योजनेत सामील होऊ शकतात.

मोदी सरकारच्या 'या' योजनेत दररोज 7 रुपये गुंतवा, दरमहा 5000 कमवा, नेमकी योजना काय?
National Pension System
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:23 AM

नवी दिल्लीः मोदी सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्यात. यापैकी एक अटल पेन्शन योजना आहे. मोदी सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना लोकांना खूप आवडली. पीएफआरडीएच्या मते, अटल पेन्शन योजनेतील (APY) ग्राहकांच्या संख्येनं 25 ऑगस्टपर्यंत 3.30 कोटींचा टप्पा ओलांडला. या योजनेअंतर्गत 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये पेन्शन 60 वर्षांच्या वयानंतर उपलब्ध आहे. बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेले 18 ते 40 वर्षे वयाचे कोणतेही नागरिक या योजनेत सामील होऊ शकतात.

आतापर्यंत 28 लाखांहून अधिक नवीन APY खाती उघडली

चालू आर्थिक वर्षात 28 लाखांहून अधिक नवीन APY खाती उघडण्यात आलीत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. PFRDA च्या मते, सुमारे 78 टक्के ग्राहकांनी 1000 रुपयांच्या पेन्शन योजनेची निवड केली आहे. त्याच वेळी सुमारे 14 टक्के लोकांनी 5,000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा पर्याय निवडला.

आपण जितक्या लवकर सामील व्हाल, तितका अधिक फायदा

अटल पेन्शन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे लहान वयात सामील व्हावे लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात, तर तुम्हाला या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करून दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते, यासाठी तुम्हाला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर दरमहा 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. 2,000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3,000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

गुंतवणूक कशी करावी?

>> अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वेबसाईटला भेट द्या. >> तुमचे आधार कार्ड तपशील येथे भरा आणि सबमिट करा. >> तुम्ही हे करताच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तुम्ही प्रविष्ट करताच पडताळणी केली जाईल. >> आता बँकेची माहिती द्या, ज्यामध्ये खाते क्रमांक आणि पत्ता टाईप करा, हे करताच तुमचे खाते सक्रिय होईल. >> यानंतर तुम्ही नॉमिनी आणि प्रीमियम पेमेंटबद्दल सर्व माहिती भरा. >> आता पडताळणीसाठी फॉर्मवर ई-सही करा. यासह अटल पेन्शन योजनेसाठी तुमची नोंदणी पूर्ण होईल.

योगदानकर्त्याच्या मृत्यूनंतर खाते चालू राहू शकते

जर APY ग्राहक 60 वर्षांच्या वयापूर्वी मृत्युमुखी पडला, तर जोडीदाराला हे खाते सुरू ठेवण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 1800-110-069 या क्रमांकावर कॉल करू शकता. जर एखाद्या ग्राहकाला 60 वर्षांपूर्वी या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर तो स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडू शकतो. या प्रकरणात त्याला व्याजासह एकूण योगदान मिळेल.

संबंधित बातम्या

तुमच्या रिकाम्या दुकानात SBI ATM कसे लावायचे? जाणून घ्या बँकेचा नियम

New Rule: नोकरी करताय मग PF संबंधित ‘हे’ काम जरुर करा, नाहीतर तुमचे पैसे बुडतील

Invest Rs 7 per day in Modi government’s Atal Pension Yojana scheme, earn Rs 5,000 per month, what exactly is the scheme?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.