कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा

पीपीएफ म्हणजेच पीएनबीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं. हे खातं उघडल्यानंतर तुम्हाला यावर आकर्षक व्याज आणि टॅक्स फ्री परतावा मिळणार आहे.

कमी पैशात PNB मध्ये करा सुरक्षित गुंतवणूक; एकाच खात्यामध्ये आकर्षक व्याज, कर्जाची सुविधा
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 8:33 AM

मुंबई : देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांच्या हितासाठी आणखी एक खास योजना आणली आहे. आपल्या ग्राहकांना कमी जोखीमात अधिक नफा मिळवून देण्यासाठी बँक पीपीएफ खातं (PPF Account) उघडण्याची संधी देत ​​आहे. पीपीएफ म्हणजेच पीएनबीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं. हे खातं उघडल्यानंतर तुम्हाला यावर आकर्षक व्याज आणि टॅक्स फ्री परतावा मिळणार आहे. (investment idea open ppf public provident account with pnb and save tax)

या योजनेचे सगळ्यात खास वैशिष्ट्ये म्हणजे ही EEE प्रकारात येते. म्हणजेच यामध्ये गुंतवणुकीवर कपातीचा चांगला फायदा मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पॉलिसी मॅच्यूअर होते तेव्हा PPF कॉर्पस पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. यासाठी तुम्हाला मिळालेल्या व्याजावर कुठलाही कर आकारला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना याचा जास्त फायदा होतो.

या खास योजनेमध्ये पीपीएफसाठी लॉक-इन कालावधी 15 वर्षे ठरवण्यात आला आहे. जर एखाद्या खातेधारकाला वेळेआधीच पैसे काढायचे असतील तर 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो अंशतः पैसे काढू शकतो. इतकंच नाही तर जर एखाद्या खातेधारकाला ही योजना आणखी पुढे चालू ठेवायची असेल तप हे आणखी पुढे चालू ठेवायचे असेल तर 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी योजना वाढवताही येऊ शकते.

किती करू शकता गुंतवणूक ?

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या खात्यामध्ये आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 150000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. तुम्हीही जर यामध्ये गुंतवणूक केली तर आयकर कलम 80 सी अंतर्गत कपातीचा फायदा तुम्हाला मिळेल. हे खातं उघडणंही सोपं आहे. पीपीएफ खातं उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक किंवा खासगी बँकांमध्ये जाऊ शकता.

PPF खात्यावर कर्ज

या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये पीपीएफ खातेदारांनाही कर्ज सुविधा मिळते. ही सुविधा तिसर्‍या आणि पाचव्या वर्षी उपलब्ध असेल. दुसर्‍या वर्षी जमा झालेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 25 टक्क्यांपर्यंत ही रक्कम असू शकते. यासाठी लॉक-इन कालावधी 15 वर्षे असला तरी सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सातव्या वर्षापासून अंशतः पैसे काढण्याची सुविधा बँकेकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (investment idea open ppf public provident account with pnb and save tax)

संबंधित बातम्या – 

आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय LPG सिलिंडर खरेदी करता येणार, जाणून घ्या प्रोसेस

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

(investment idea open ppf public provident account with pnb and save tax)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.