AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरची तुफान बॅटिंग, 10 हजारांचे झाले 6 लाख

Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरने तुफान बॅटिंग केली आहे. गुंतवणूकदारांच्या 10 हजारांचे 6 लाख झाले.

Tata Group : टाटा समूहाच्या या शेअरची तुफान बॅटिंग, 10 हजारांचे झाले 6 लाख
| Updated on: Jun 10, 2023 | 7:43 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने मरगळ झटकली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजाराने आघाडी घेतली आहे. बाजाराने एकाच दिवसात जोरदार फायदा मिळवून दिला. काही कंपन्यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना वसुली करुन दिली. टाटा समूहाच्या (Tata Group Stock) या शेअरने तुफान बॅटिंग केली. या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. 10 वर्षांतच गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला. टाटाच्या एलेक्सीने (Tata Elxsi Share Price) जबरदस्त रिटर्न दिला. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य सध्या जवळपास 6 लाख रुपये आहे.

आघाडीची कंपनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात आहेत. तर काही कंपन्या शेअर बाजारात नाही. टाटाची उत्पादने विश्वसनीय म्हणून ओळखल्या जातात. टाटा एलेक्सी ऑटोमोटिव्ह, मीडिया, टेलिकॉम, हेल्थकेअर आणि ट्रान्सपोर्टेशन सह अनेक सेक्टरमध्ये डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सेवा पुरविणारी अग्रेसर कंपनी आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह आणि ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीजमध्ये अग्रगण्य ओईएम आणि पुरवठ्यासोबतच आरएंडडी, डिझाईन आणि प्रोडक्ट इंजिनिअरिंग सेवामध्ये काम करते.

शेअरहोल्डिंग पॅटर्न कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे कंपनीचा 56.08 टक्के हिसा आहे. तर प्रमोटर्सकडे या कंपनीचा 43.92 टक्के वाटा आहे.

टाटा एलेक्सीच्या शेअरचा भाव टाटा एलेक्सीच्या शेअरचा भाव शुक्रवारी 0.38 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 7,815 रुपयांवर बंद झाला. गेल्या काही महिन्यात या शेअरमध्ये 9.73 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 16.78 टक्क्यांनी वधारला. या स्टॉकमध्ये यावर्षी आतापर्यंत 24.04 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात या शेअरमध्ये 9.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या पाच महिन्यात या शेअरने 500 टक्के परतावा दिला आहे.

तिमाही निकाल जोरदार आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत Tata Elxsi चा निव्वळ नफा 25 टक्क्यांनी वाढून तो 201 कोटी रुपयांवर पोहचला. एक वर्षांपूर्वीच्या समान तिमाहीत हा आकडा 160 कोटी रुपये होता.

कंपनी होईल कर्जमुक्त टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.