Mukesh Ambani : गुंतवणूकदारांसाठी सुगीचा हंगाम! रिलायन्समुळे कमाईचा योग

Mukesh Ambani : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी सुगीचा हंगाम सुरु आहे. त्यांना रिलायन्समुळे लॉटरी लागली. नव्या बदलामुळे त्यांची कमाईच कमाई सुरु आहे. वित्तीय क्षेत्रात आता तीव्र स्पर्धा येईल. त्याचा पण मोठा परिणाम या बाजारावर होईल.

Mukesh Ambani : गुंतवणूकदारांसाठी सुगीचा हंगाम! रिलायन्समुळे कमाईचा योग
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 2:16 PM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : शेअर बाजाराने रिलायन्सनसाठी (Reliance Industry) आज 20 जुलैसाठी विशेष ट्रेडिंग सेशन घेतले. या प्री-ओपन सेशनमुळे नवीन कंपनीच्या शेअरची किंमत समोर आली. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या (Jio Financial Services) शेअरची किंमत निश्चित झाली. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी सुगीचा हंगाम सुरु आहे. त्यांना रिलायन्समुळे लॉटरी लागली. नव्या बदलामुळे त्यांची कमाईच कमाई सुरु आहे.  रिलायन्सच्या शेअरवर पण या कवायतीचा प्रभाव पडला आहे.  या घडामोडींमुळे वित्तीय क्षेत्रात आता तीव्र स्पर्धा येईल. त्याचा पण मोठा परिणाम या बाजारावर होईल.

गुंतणूकदारांचा असा फायदा

रिलायन्सचे 1000 शेअर असतील तर गुंतवणूकदारांना JFSLचे 1000 शेअर मिळतील. आता एका शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित झाली आहे. म्हणजे एका झटक्यात गुंतवणूकदारांना 2,61,850 रुपयांचा फायदा झाला. त्यांना एकदम लॉटरी लागली. हा शेअर आता जसा वधारेल. तसा गुंतवणूकदारांना फायदा होईल. गुंतवणूकदारांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाती लागली आहे.

हे सुद्धा वाचा

261.85 रुपयांचा शेअर

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.

बीएसईवर काय किंमत

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

रिलायन्सच्या शेअरची स्थिती

रिलायन्सच्या शेअरमध्ये चढउताराचे सत्र आहे. स्पेशल सेशननंतर एनएसईवर हा शेअर तेजीत आहे. तो 11 वाजता 2,611.95 रुपयांवर होता. कालच्या क्लोजिंग प्राईसच्या तुलनेत त्यात 8 टक्क्यांची घसरण आहे. तर बीएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 1.30 टक्के तेजी दिसून आली. हा शेअर 2623.20 रुपयांवर व्यापार करत होता. कालच्या क्लोजिंग प्राईसच्या तुलनेत त्यात 7.63 टक्के घसरण दिसून आली.

सप्टेंबरमध्ये झाला होता निर्णय

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज आज, रिलायन्स इंडस्ट्रीजपासून स्वतंत्र झाली. आरआयएलने 8 जुलै रोजी ही नवीन कंपनी अस्तित्वात येईल अशी घोषणा बीएसई फाईलिंगवेळी केली होती. या डिमर्जरला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने मंजूरी दिली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने या घडामोडींची माहिती दिली होती. सप्टेंबर महिन्याच्या तिमाही वेळी ही घोषणा झाली होती. त्यानुसार, जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली.

नवीन कंपनीची मालमत्ता

या नवीन कंपनीचे एकूण भागभांडवल जवळपास 1,50,000 कोटींच्या घरात आहे. त्यामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपये मूल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आहेत. उर्वरीत रक्कम तिचे मुळ भांडवल आहे. त्या तुलनेत स्पर्धक कंपनी बजाज फायनान्सचा पसारा मोठा आहे. ही NBFC वित्तीय सेक्टरमधली मोठी कंपनी आहे. तिचे एकूण भांडवल जवळपास 44,000 कोटी रुपये आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.