Multibagger Stock : 12 रुपयांच्या स्टॉकची कमाल, एक लाख झाले एक कोटी! ही कंपनी तरी कोणती

Multibagger Stock : फार्मा सेक्टरमधील दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंतीचं अचूक औषध दिलं आहे. या कंपनीने कमाल परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार एकदम खूश झाले आहेत. कोणती आहे ही कंपनी?

Multibagger Stock : 12 रुपयांच्या स्टॉकची कमाल, एक लाख झाले एक कोटी! ही कंपनी तरी कोणती
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 5:37 PM

नवी दिल्ली : फार्मा सेक्टरमधील दिग्गज कंपनी अजंता फार्माने (Ajanta Pharma) गुंतवणूकदारांना एकदम मालामाल केले आहे. बुधवारी या स्टॉकने नकारात्मक परतावा दिला. बाजाराच्या भीतीने हा शेअरही गडगडला. पण गेल्या काही वर्षात हा शेअर मल्टिबॅगर (Multibagger Stock) ठरला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या शेअरने मालामाल केले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात अजंता फार्मा अजून सूसाट धावेल. बुधवारी हा स्टॉक 1.11 टक्के घसरणीसह 1,191 रुपयांवर बंद झाला. अजंता फार्माच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या स्टॉकने एक लाख रुपयांचा 12 वर्षांत एक कोटी रुपये परतावा दिला आहे.

अजंता फार्माचा शेअर 29 जानेवारी 2010 रोजी 12.14 रुपयांना मिळत होता. आता याची किंमत 1200 रुपये आहे. या स्टॉकने 1427.50 रुपयांचा 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला होता. तर या स्टॉकचा 52 आठवड्यांतील नीच्चांकीस्तर 1061.77 रुपये आहे. अजंता फार्माच्या शेअर गेल्या 5 वर्षांत 3.97 टक्के घसरला. गेल्या महिन्यात हा शेअर 2.10 टक्के घसरला होता. सहा महिन्यात हा शेअर 8.52 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

29 जानेवारी 2010 पासून या स्टॉकने किती उसळी घेतली ते पाहुयात. या स्टॉकने गेल्या 12 वर्षांत 100 पटीत उसळी घेतली आहे. गेल्या 13 वर्षांत या शेअरने 10 हजार टक्के उसळी घेतली आहे. सुरुवातीला ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्यांना आता एक कोटी रुपयांचा परतावा या स्टॉकने दिला आहे. जानेवारी 2010 मध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती आज करोडपती झाली आहे.

हे सुद्धा वाचा

हा शेअर 11 मे 2022 रोजी त्याच्या 52 आठवड्यांच्या निच्चांकी स्तर 1061.77 रुपयांवर पोहचला. त्यानंतर चार महिन्यात या शेअरने 34 टक्क्यांची उसळी घेतली. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 1425.80 रुपयांवर पोहचला. त्यानंतर अजंता फार्माचा शेअर जोरदारपणे घसरला. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत हा शेअर 16 टक्के गतीने झेपावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कंपनीने गेल्या दोन तीन वर्षांत नफ्यात वृद्धीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ही कंपनी भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडात ब्रँडेड जेनेरिक्स पुरवठा करण्यात आघाडीवर आहे. अमेरिकेत मान्यतेसाठी ही कंपनी प्रयत्नरत आहे. गेल्या काही दिवसात व्यवसाय वाढीसाठी कंपनीने कंबर कसली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. येत्या काही दिवसांत हा शेअर 16 टक्के गतीने झेपावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्यांना आता एक कोटी रुपयांचा परतावा या स्टॉकने दिला आहे. जानेवारी 2010 मध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती आज करोडपती झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.