Mutual Fund : म्युच्युअल फंड सही है! मग गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ

Mutual Fund : म्युच्युअल फंड सही है, अशी जाहिरात आपण पाहिली असेलच, पण सध्या म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे.

Mutual Fund : म्युच्युअल फंड सही है! मग गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 7:55 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही महिन्यांपासून तेजीचे सत्र आहे. त्यातून गुंतवणूकदारांना जोरदार कमाई होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी करुन ती शेअर बाजाराकडे वळवली आहे. म्युच्युअल फंडात सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणूक घटली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील (Mutual Fund)  गुंतवणूक मे महिन्यात तर थेट अर्ध्यावर आली. मे महिन्यात 3,240 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. बाजारात तेजीचे सत्र असल्याने गुंतवणूकदारांनी चांगलीच छपाई केली आहे. गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

असा आला पैसा म्युच्युअल फंडात मे महिन्यात गुंतवणूक आली. पण ती अर्धीच होती. डेट फंडात 57,420 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एप्रिल महिन्यात ही गुंतवणूक 1.21 लाख कोटी रुपये होती. डेट फंडात पण गुंतवणूक घसरली. डेट फंडात एकूण 46,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक आली. तर एप्रिल महिन्यात हाच गुंतवणुकीचा आकडा 1.06 लाख कोटी रुपये होता. यावरुनच गुंतवणूक किती कमी झाली हे स्पष्ट होते.

मे महिन्यात कमाल घसरण म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा टक्का इतका घसरले याचा गुंतवणूक तज्ज्ञांना पण अंदाज नव्हता. एप्रिल महिन्याच्या शेवटी मालमत्ता व्यवस्थापन जमापुंजी 41.62 लाख कोटींहून 43.2 लाख कोटींवर येऊन ठेपली. आकडेवारीनुसार, मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 3,240 कोटी रुपये आले तर एप्रिल महिन्यात हा आकडा 6,480 कोटी रुपये होता. मार्चमध्ये निव्वळ गुंतवणूक 20,534 कोटी रुपये होती. तर इक्विटी सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांनी 50 टक्के गुंतवणूक वाढवली. स्मॉल कॅप फंडात 3,282 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंड काय आहे म्युच्युअल फंड शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे. ज्या लोकांना शेअर बाजार कळत नाही. अथवा त्यातील बारकाव्यांचा अभ्यास नाही. तसेच ज्यांना जोखीम नको, ते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करु शकतात. मोठ-मोठे फंड हाऊस गुंतवणूकदारांची रक्कम योग्य पद्धतीने विविध सेक्टरमधील शेअरमध्ये गुंतवितात. त्याआधारे नफा कमवितात आणि तो गुंतवणूकदारांमध्ये वाटतात. अर्थात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पण बाजारातील जोखीम आधारीत असते.

लार्ज कॅप फंड्स फायद्याच बाजारातील तज्ज्ञानुसार, लार्ज कॅप फंडात तुम्ही पैसा गुंतवू शकता. त्यामध्ये आतापर्यंत जोरदार रिटर्न मिळाले आहेत. गुंतवणूकदार मिडकॅप फंडमध्ये पैसा गुंतवू शकतात. इक्विटी फंड ही गुंतवणुकीसाठी योग्य. तर गुंतवणुकीतील काही हिस्सा डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतविता येईल.

SIP आणि STP फायदेशीर बुडत्या बाजारातून कमाई करण्यासाठी म्युच्युअल फंडात SIP हा चांगला पर्याय आहे. बाजारातील जोखीमेतूनही चांगला परतावा घ्यायचा असेल तर SIP हा चांगला पर्याय ठरेल. बाजारातील जोखीमेआधारेच म्युच्युअल फंडातून कमाई करता येते. बाजारात पडझड होत असताना SIP त वाढ करणे फायदेशीर ठरते, असा तज्ज्ञाचा सल्ला आहे. त्यामुळे तुमची सरासरी वाढते आणि दीर्घकालीन फंडात मोठा परतावा मिळतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.