Share Market : अजून हवंय काय, 75 दिवसांत डबल पैसा, कमाईचा गोल्डन चान्स

Share Market : शेअर बाजारात काही कंपन्या नुकत्याच सूचीबद्ध झाल्या. त्यापैकी या कंपनीने आल्या आल्याच धावफलक हलताच ठेवला नाही तर मोठी धावसंख्या पण उभारली. नवीन रेकॉर्ड केले. या कंपनीने गुंतवणूकदारांना सोन्यावाणी परतावा दिला. सोन्याची दागिने विक्री करणाऱ्या या कंपनीने अडीच महिन्यात दुप्पट परतावा दिला.

Share Market : अजून हवंय काय, 75 दिवसांत डबल पैसा, कमाईचा गोल्डन चान्स
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 3:43 PM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market)चढउतार सुरु आहे. काही कंपन्यांनी अशा परिस्थितीत पण मोठा चमत्कार केला आहे. शेअर बाजारात नुकतीच दाखल झालेल्या या सोने विक्री करणाऱ्या कंपनीने अशीच कमाल केली आहे. या कंपनीने मोठा धुमाकूळ घातला. या कंपनीचा आयपीओ नुकताच बाजारात येऊन गेला. त्यानंतर ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. पण आल्या आल्याच या कंपनीने तडाखेबंद फलंदाजी सुरु केली. गुंतवणूकदारांच्या भरवशावर कंपनीने जोरदार घौडदौड केली. अवघ्या अडीच महिन्यात कंपनीने दुप्पट परतावा (Double Return) दिला. या कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्के तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांना योग्य ठिकाणी पैसा गुंतवल्याचे समाधान मिळाले. ज्यांनी आयपीओत पैसा लावला, त्यांना तर जोरदार फायदा झाला.

Senco Gold Share

शेअर बाजारात सॅनको गोल्डचा आयपीओ नुकताच आला. या कंपनीने येताच जोरदार कामगिरी बजावली. सॅनको गोल्डने बाजारात दाखल होताच उत्तम कामगिरी बाजवली. बीएसईवर या शेअरने 600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सॅनको गोल्डचा आयपीओ या जुलै महिन्यात आला होता. तेव्हापासून हा शेअर सातत्याने आगेकूच करत आहे.

हे सुद्धा वाचा

इतका वधारला शेअर

बीएसईवर सॅनको गोल्डचा शेअर 533 रुपयांच्या स्तरावर उघडला. या शेअरमध्ये 17 टक्क्यांची उसळी दिसली. या तेजीने हा शेअर 626.40 रुपयांवर पोहचला. या कंपनीने बाजारात चांगली कामगिरी बजावली तशी व्यापारात पण चमकदार कामगिरी केली. त्यामुळे कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला. यापूर्वी मंगळवारी कंपनीचा शेअर 532.35 रुपयांवर बंद झाला.

काय होता आयपीओचा प्राईस ब्रँड

सॅनको गोल्ड आयपीओ 4 ते 6 जुलै दरम्यान उघडला होता. कंपनीच्या आयपीओची किंमत 301 रुपये ते 317 रुपये होती. सॅनको गोल्ड आयपीओची लॉट साईज 47 शेअर अशी होती. गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,899 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक होते. सॅनको गोल्ड आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसईमध्ये झाली होती. कंपनीने एंकर गुंतवणूकदारांकडून 121.50 कोटी रुपये जमा केले होते. ही कंपनी बीएसईवर 431 रुपये तर एनएसईवर 430 रुपयांवर सूचीबद्ध झाली होती. या कंपनीने गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्याच दिवशी 100 रुपयांचा फायदा मिळवून दिला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.