AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Outlook | गुंतवणूकदार लवकरच मालामाल, शेअर बाजार डिसेंबरमध्ये 19 हजार!

Share Market Outlook | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत गोड बातमी. बँक ऑफ अमेरिकन सिक्युरिटीजने भारतीय बाजाराविषयी विश्वास नोंदवला आहे. त्यानुसार, डिसेंबरपर्यंत निफ्टी 19 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो.

Share Market Outlook | गुंतवणूकदार लवकरच मालामाल, शेअर बाजार डिसेंबरमध्ये 19 हजार!
बाजार बूमImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 30, 2022 | 4:49 PM
Share

Share Market Outlook | गेल्या दीड-दोन वर्षांपासून आचके देत असलेल्या शेअर बाजाराला (Share Market) अच्छे दिन येण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हा अंदाज कोण्या भारतीय पतसंस्थेने, वित्तीय भागीदाराने नोंदवला नाही. तर अमेरिकन ब्रोकरेज फर्म बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने (BofA) विश्वास नोंदवला आहे. त्यानुसार, डिसेंबरपर्यंत निफ्टी 19 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो. निफ्टी 19500 ची पातळी गाठू शकतो. BofA चा अंदाज आहे की, डिसेंबरच्या अखेरीस निफ्टी (Nifty) 18500 ते 19500 अंकांदरम्यान खेळेल. सध्या निफ्टी 17650 च्या पातळीवर आहे. सध्याच्या पातळीच्या तुलनेत ही वाढ 8-10 टक्के आहे. परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूकदार येत्या काही महिन्यांत बंपर कमाई (Bumper Earnings) करतील, असा त्यांचा अंदाज आहे. तेव्हा आतापासूनच विचारपूर्वक अभ्यास करुन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. अंदाज खरा ठरला तर तुम्ही अवघ्या काही महिन्यात लखपती, करोडपती ही व्हाल.

परदेशी गुंतवणूकदारांमुळे उत्साह

BofA नुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजाराचा रस्ता धरला आहे. NSDL च्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, ऑगस्टमध्ये FPIs (Foreign Portfolio Investors) ने आतापर्यंत सुमारे 50 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. सरकारची आर्थिक स्थिती सुधारत आहे. कर संकलन विक्रमी पातळीवर पोहचले आहे. केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाचे(CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी यासंबंथी माहिती दिली आहे. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 4.75 लाख कोटी रुपये कर संकलन झाले आहे. वार्षिक आधारावर, त्यात 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 14.20 लाख कोटी कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.

निफ्टीत वाढ

BofA विश्लेषकांनी अंदाज वर्तवला आहे. सकारात्मक आणि नकारात्मक जोखमीचा विचार करता, निफ्टी 17000 ते 19500 अंकांच्या श्रेणीत व्यापार करेल. डिसेंबरसाठी लक्ष्य 18500 अंक आहे. सध्या चीनमधील आर्थिक सुधारणेचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला आहे, त्यामुळे भारतात येणारी विदेशी गुंतवणूक (FII) दिसून येते. याशिवाय जागतिक राजकारणावर युद्धाचे सावट आहे. यामध्ये तणाव वाढल्यास बाजारावर दबाव वाढेल. या स्थितीतही निफ्टी 17000 अंकांच्या दिशेने जाईल.

निवडणुकांचा परिणाम

BofA ने आपल्या अहवालात म्हटले आहे की नोव्हेंबर 2023 पर्यंत कर्नाटक आणि गुजरात या दोन मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार सुधारणांबाबत खुलेपणाने निर्णय घेऊ शकते. उदयोन्मुख बाजारपेठेत भारताची स्थिती चांगली राहिल. महागाईचा दबाव कमी होईल. रुपया चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. सर्व घटकांचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल.

सेन्सेक्सची लवकरच 62 हजारी सलामी

आयआयएफएल सिक्युरिटीजचे (IIFL Securities) अनुज गुप्ता यांचेही म्हणणे आहे की, लवकरच निफ्टी 18 हजारांची पातळी ओलांडून 18200 च्या दिशेने जाईल. बँक निफ्टी 40,500 चा टप्पा गाठेल. सेन्सेक्समध्ये 62000 पर्यंतची पातळी लवकरच दिसू शकते.

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.