शेअर बाजारात IOB चा भाव वधारला; PNB आणि बँक ऑफ बडोदाला टाकले मागे
IOB | गेल्या महिनाभरात IOB च्या भांडवली मूल्यात तब्बल 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर PNB चे भांडवली मूल्य 4 टक्क्यांनी घसरले आहे. बँक ऑफ बडोदाच्या भांडवली मुल्यात 5 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.
मुंबई: इंडियन ओव्हरसीज या सरकारी बँकेचा शेअर बाजारातील भाव अचानक वधारला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने शुक्रवारी भांडवली बाजारात 50000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. त्यामुळे आता IOB भांडवली बाजारातील सर्वाधिक मोठी दुसऱ्या क्रमांकाची बँक झाली आहे. IOB ने पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदालाही मागे टाकले आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार मुंबई शेअर बाजारात IOB ची मार्केट कॅप 51,887 कोटी रुपये इतकी झाली होती. तर PNB आणि बँक ऑफ बडोदाची मार्केट कॅप अनुक्रमे 46,411 आणि 44,112 कोटी रुपये इतकी आहे. (IOB became second largest bank with 50000 crore market cap in share market)
गेल्या महिनाभरात IOB च्या भांडवली मूल्यात तब्बल 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर PNB चे भांडवली मूल्य 4 टक्क्यांनी घसरले आहे. बँक ऑफ बडोदाच्या भांडवली मुल्यात 5 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. मोदी सरकारकडून लवकरच IOB चे खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे IOB च्या भांडवली मूल्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे सांगितले जाते.
IOB बँकेच्या शेअरचा भाव वाढला
30 जून 2021 रोजी IOB च्या शेअरचा भाव 29 रुपये इतक्या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्यावर्षी IOB बँकेला 144 कोटींचा नफा झाला होता. तसेच बँकेच्या संपत्तीतमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय, बँकेच्या खात्यातील बुडीत कर्जाची टक्केवारीही 3.58 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
IDBI बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात
आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आता केंद्राने आयडीबीआय निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकार आणि एलआयीकडून आयडीबीआय (IDBI Bank) बँकेतील हिस्सेदारी विकण्यात येणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी आता केंद्र सरकार कायदेशीर आणि व्यावहारिक सल्लागाराचा शोध घेत आहे. जेणेकरून या व्यवहारात कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही. यासाठी केंद्र सरकारने 13 जुलैपर्यंत संबंधितांना आपला प्रस्ताव सादर करण्याची मुदत दिली आहे.
संबंधित बातम्या:
Banks Privatization: सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी जोरदार हालचाली; केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक
मोदी सरकारचं महत्वाचं पाऊल; ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात
Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार
(IOB became second largest bank with 50000 crore market cap in share market)