Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई

IPL 2025 : IPL ही केवळ टूर्नामेंट नाही. तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?

IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई
आयपीएल २०२५ सरकारची कमाईImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Follow us
| Updated on: Mar 27, 2025 | 10:54 AM

आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते. IPL केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते?

IPL मधून होते कमाई?

IPL ची सर्वात मोठी कमाई मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्समधून होते. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा मिळून 2023 ते 2027 पर्यंतचे आयपीएलचे ब्रॉडकास्ट राइट्स ख़रीदे केले आहेत. त्यासाठी त्यांनी 48,390 कोटी रुपयांची डील झाली आहे. आयपीएलच्या माध्यमातून दरवर्षी 12,097 कोटी रुपयांची कमाई होते. ही रक्कम BCCI आणि फ्रेंचाईज यांच्या दरम्यान 50-50 टक्के अशी वाटून घेण्यात येते.

हे सुद्धा वाचा

BCCI नाही देत कर

धक्कादायक म्हणजे दरवर्षी 12 हजार कोटींची कमाई करणारी BCCI एक रुपया पण कर भरत नाही. आयपीएलच्या या भव्यदिव्य महाकुंभावर सरकार थेट कर आकारत नाही. BCCI ने 2021 मध्ये आयपीएल केवळ क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केल्याचा दावा केला होता. कर न्यायाधिकरणाने BCCI ची ही विनंती मान्य केली होती. त्यामुळे आतापर्यंत आयपीएलवर सरकारकडून थेट कर आकारण्यात आलेला नाही.

मग सरकार कशी करते कमाई?

IPL ही कर मुक्त असावी अशी मागणी असली तरी सरकार यामाध्यमातून कमाई करते. सरकार खेळाडूंच्या पगारावर टीडीएस (TDS) कापून मोठी कमाई करते. 2025 मध्ये मोठा लिलाव झाला. 10 संघांनी खेळाडू खरेदी केले. त्यासाठी 639.15 कोटी रुपये खरेदी केले. या दरम्यान 120 भारतीय आणि 62 परदेशी खेळाडूंची निलामी करण्यात आली. या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या वेतनातून सरकार कर वसूल करते. त्यानुसार भारतीय खेळाडूकडून 10% तर परदेशी खेळाडूंच्या पगारावर 20% टीडीएस सरकार कापण्यात येतो. सरकारला या टीडीएसमधून IPL 2025 मध्ये 89.49 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.