IPO Market : आयपीओचा फुटला पोळा! गुंतवणूक करावी कुठं बरं

IPO Market : आयपीओचा बाजार सध्या गरम आहे. आयपीओचा जणू पोळाच फुटला आहे. बाजारात आयपीओचे पीक आल्याने आता गुंतवणूकदारांना कोणता आयपीओ खरेदी करावा असा पेच पडला आहे. गेल्यावेळी अनेक नामचिन ब्रँड बाजारात आले. पण त्याचा गुंतवणूकदारांना उलट मनस्ताप झाला.

IPO Market : आयपीओचा फुटला पोळा! गुंतवणूक करावी कुठं बरं
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 4:03 PM

नवी दिल्ली : आयपीओचा बाजार (IPO Market) सध्या गरम आहे. आयपीओचा जणू पोळाच फुटला आहे. बाजारात आयपीओचे पीक आल्याने आता गुंतवणूकदारांना कोणता आयपीओ खरेदी करावा असा पेच पडला आहे. कंपनी बाजारात सूचीबद्ध होताना जास्त किंमतीवर लिस्टेड होते. या वरकमाई सोबतच दीर्घकाळ गुंतवणुकीतून अनेकांना मोठा धनलाभ पदरात पडतो. गुंतवणूकदार (Investors) या कमाईसाठी आयपीओत मोठी गुंतवणूक करतात. पण प्रत्येकवेळी हा निर्णय धनवान करतोच असे नाही. गेल्यावेळी अनेक नामचिन ब्रँड बाजारात आले. या ब्रँडच्या नावामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. एलआयसीसह अनेक ब्रँडने नफा सोडा गुंतवणूकदारांना उलट मनस्ताप दिला. त्यामुळे आयपीओ निवडताना चोखंदळ असणे आवश्यक आहे. बाजारगप्पांवर नाही तर निकषावरच आयपीओ खरेदी केल्यास मोठा फायदा होतो.

RHP वर ठेवा लक्ष कोणतीही कंपनी आयपीओ आणण्यापूर्वी सेबीकडे तिचा प्रस्ताव देते, म्हणजेच ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर करते. सेबीच्या मंजुरीनंतर कंपनी आयपीओ प्राईस ब्रँड म्हणजे किंमत आणि साईज, म्हणजे किती शेअर बाजारात उतरवायचे याचे गणित मांडते. ही सर्व माहिती तुम्हाला RHPमध्ये मिळते.

कंपनीचा बायोडाटा तपासा कंपन्या नोकरी देताना तुमचा बायोडाटा, रिझ्यूमी तपासते. तुम्ही मोठा पैसा गुंतवत असल्याने कंपनीचा बायोडाटा तपासून पाहा. म्हणजे कंपनी कोणता उद्योग करते. तिचे भागभांडवल किती, तिचा नफा-तोटा, तिची वार्षिक उलाढाल. जो व्यवसाय ही कंपनी करत आहे. त्यासाठी कंपनीने काय योजना आखल्या आहेत. हा सर्व तपशील जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

कंपनीचे मार्केट कोणते? हा महत्वाचा मुद्दा आहे. कंपनी आपल्या मातीतली असली आणि तिचा व्यापार परदेशात ही पसरला असले, तर फायदेशीरच आहे. तेव्हा कंपनी कोणत्या बाजारपेठेत आहे. त्या बाजारपेठेत काय हालचाल, उलाढाली सुरु आहेत, त्याची माहिती करुन घ्या. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी ही कंपनी किती फायदेशीर ठरु शकते, याची तुम्हाला यावरुन चाचपणी करता येईल.

प्रमोटर्स, कंपनीची माहिती घ्या कंपनीचे प्रमोटर्स कोण आहे. त्यांची उलाढाल, ते अजून कोणत्या कंपनीत संचालक आहेत का? कंपनीवर, संचालकांवर किती कर्ज आहे. एखाद्या घोटाळ्यात तर त्यांचे नाव नाही ना, त्यांची चौकशी सुरु आहे का, अशी माहिती अगोदरच मिळवा. नाहीतर तुमच्या मेहनतीचा पैसा वाया पण जाऊ शकतो.

आयपीओचा निधीचा कुठे वापर कंपनी आयपीओच्या माध्यमातून जो पैसा जमा करत आहे. त्याचा वापर कुठे करण्यात येणार आहे. कंपनीची योजना काय आहे. कंपनी केवळ कर्ज फेडीसाठी आयपीओ बाजारात आणत आहे का? एखादे वित्तीय संकटासाठी तुमच्याकडून पैसा गोळा करण्यात येत आहे का, हे पण तपासा. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करा.

नवीन शेअर की ऑफर फॉर सेल आयपीओच्या माध्यमातून नवीन शेअर देण्यात येणार आहेत का? सध्याचे प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत शेअर्सची विक्री करत आहेत, हे पण तपासा. केवळ ओएफएस असेल तर बाजारातील तज्ज्ञ हा सौद्या फायद्याचा मानत नाहीत. कारण हे शेअर्स प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्सकडून येतात.

SWOT सूत्राचा विसर नको हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही आयपीओत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा युएसपी जाणून घ्या. त्यासाठी SWOT सूत्राचा वापर करा. ताकद, कमकूवतपणा, संधी आणि धोका या चार बाजूने विचार करा आणि नंतरच आयपीओमध्ये गुंतवणूक करा. डोळे झाकून, बातम्या वाचून, युट्यूब व्हिडिओ बघून त्यांच्या मतांवर तुमचं मत ठरवू नका. त्या मताचा आदर करा. पण स्वतःवर ती लादू नका. तुम्ही पण रिसर्च करा. कारण पैसा तुमचा गुंतणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.