IPO Market | कमाईची संधी! Ola पासून स्विगीपर्यंत अनेक कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात

IPO Market | आयपीओने यंदा गुंतवणूकदारांना मालामाल केले. त्यांना मोठा फायदा झाला. अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. त्यांनी मोठी कमाई करुन दिली. ज्यांना या काळात कमाईची संधी मिळाली नाही. त्यांनी खट्टू होण्याची गरज नाही. आगामी 2024 मध्ये आयपीओ बाजार बहरणार आहे, 60,000 कोटींचे आयपीओ येतील.

IPO Market | कमाईची संधी! Ola पासून स्विगीपर्यंत अनेक कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 11:41 AM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणि नवीन कँलेंडर वर्ष 2024 मध्ये दमदार खेळाडू आयपीओ बाजारात उतरण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ओला इलेक्ट्रिक आयपीओची. त्यासोबतच स्विगी आणि इतर ही कंपन्या रांगेत आहेत. नवीन वर्षात आयपीओ बाजार बहरणार आहेत. बाजारात 60,000 कोटींचे आयपीओ येणार आहेत. या वर्षात ही अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. त्यात सरकारी कंपन्या पण मागे नाहीत. ओला बाजारातून 5,836-6,670 कोटींचे भांडवल उभारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी पैसा गाठीशी ठेवा.

अनेक कंपन्या रांगेत

प्राईम डेटाबेसने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या वर्षात एकूण 57 कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. त्यांनी बाजारातून 49 हजार कोटींचे भांडवल उभे केले. तर 27 कंपन्या शेअर बाजारात उतरणार आहेत. त्यांनी सेबीकडे अर्ज केला आहे. 29 हजार कोटी उभारणीसाठी या कंपन्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. तर 29 कंपन्यांना 34 हजार कोटींचे भांडवल उभारायचे आहे. सेबीकडून मंजुरीसाठी त्या रांगेत आहेत.

हे सुद्धा वाचा

या कंपन्या मैदानात

यावर्षी ओला इलेक्ट्रिक, स्विगी, फर्स्टक्राय या कंपन्यांचा आयपीओ धडकू शकतो. ओयो कंपनी 400 दशलक्ष डॉलरचं भांडवल उभारणार आहे. स्विगी 500 दशलक्ष डॉलर उभारण्याच्या तयारीत आहे. तर फर्स्ट क्राय बाजारातून 600 दशलक्ष डॉलर उभारणीच्या तयारीत आहे. टाटा प्ले, एबिक्सकॅश, इंडिजिन, ओरावल स्टेज, गो डिजिट जनरल इन्शुरन्स, पोर्टिया मेडिकल आणि टीबीओ टेकचा आयपीओ लवकरच बाजारात येतील.

ओलाचा खप वाढला

ओला इलेक्ट्रिकने 2021 मध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली. त्यानंतर ओलाच्या स्कूटरने मोठी घौडदौड केली. जून 2021 मध्ये 4,000 युनिट्स स्कूटर प्रत्येक महिन्यात विक्री होत होत्या. 2022 मध्ये 80 हजार युनिट्स स्कूटर प्रत्येक महिन्याला विक्री झाल्याचा दावा करण्यात येत आहे. विक्रीत 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ओलाने 30,000 EV ची विक्री केली. Ola s1x, s1 Pro आणि S1 Air हे तीन मॉडेल सध्या बाजारात आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.