Insurance : देशातील निम्म्याहून अधिक वाहने इन्शुरन्स विना, दुर्घटना घडल्यास ना घर का ना घाट का
Insurance : देशातील रस्त्यावर मृत्याचे आमंत्रण घेऊन यमदूत धावत आहेत..त्यामुळे वाहन चालविताना सावध रहा..
नवी दिल्ली : विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDIA) एक धक्कादायक विधान केले आहे. प्राधिकरणाने देशातील रस्त्यांवर सुरु असलेल्या एकूण वाहनांपैकी जवळपास निम्मी वाहने विना इन्शुरन्स (Insurance) धावतात. यावरुन देशातील अर्ध्याहून अधिक वाहनधारकांनी (Vehicles Owner) विमाच घेतला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा वाहनांचा इतर वाहनधारकांनाही धोका जास्त आहे.
प्राधिकरणाचे संचालक देबाशीष पांडा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात इन्शुरन्सची ही धक्कादायक आकडेवारी सांगितली. विम्याची ही निम्मी भरपाई करण्यासाठी तरुणांनी नवनवीन कल्पना सुचवावी असे पांडा यांनी आवाहन केले आहे. विम्यातील हा जवळपास 83 टक्के गॅप भरून काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्राधिकरणाने विमा खरेदीतील किचकट प्रक्रिया हटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. ही प्रक्रिया सुटसूटीत व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. वाहनधारकांना सहज विमा खरेदी करता यावा यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर विमा विक्री वाढवण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर डिजिटल पद्धतीने विमा विक्रीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. खरेदीदारांना आता कॉन्ट्रक्टची चिंता करण्याची गरज नाही. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विमा खरेदी-विक्रीच होणार नाही, तर पॉलिसी सेटलमेंटचेही काम करण्यात येणार आहे.
विमा क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे विमा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. येत्या काही वर्षात भारत जगातील सहावी सर्वात मोठी विमा बाजारपेठ असेल. पुढील 10 वर्षात विमा क्षेत्रासाठी महत्वाची आहेत. जागतिक आर्थिक वृद्धी दर सध्या 2.9 टक्के आणि भारताचा वृद्धी दर 7 टक्के राहणार आहे. त्याचा विमा क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
एलआयसीचे अध्यक्ष एम.आर. कुमार यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक 100 भारतीय मागे केवळ 3 व्यक्तींकडेच जीवन विम्याचे कवच आहे. कोविड काळात विमा क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असली तरी विम्याचे हे प्रमाण अत्यंत तोकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.