फक्त रेटिंग पाहून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे का ?
म्युच्युअल फंडातून चांगला परतावा मिळत असल्यानं अनेक जण फंडाची रेटिंग पाहून गुंतवणूक करतात. त्यामुळे अनेकदा नुकसान होते अशावेळी काय करावं जाणून घ्या.
मुंबई : बहुतेक गुंतवणूकदार रेटिंग पाहून गुंतवणूक करतात. कंपन्याही जास्त रेटिंग असणाऱ्या फंडा प्रचार जोरात करतात. अनेक कंपन्या फंडाची रेटिंग जारी करतात. रेटिंगद्वारे परतावा आणि जोखिमेचे संकेत मिळतात तसेच फंडाच्या कामगिरीचीही माहिती मिळते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना फार रिसर्च करावा लागू नये म्हणून गुंतवणूकदार फंडचं रेटिंग बघून गुंतवणूक करतात. तसेच, चांगलं रेटिंग असणाऱ्या फंड्सची विक्री करण्यावर कंपन्यांचा भर असतो. म्हणूनच म्युच्युअल फंडच्या रेटिंगबद्दल समजून घेणं महत्वाचं आहे. क्रिसिलसारख्या क्रेडिट रेटिंग एजन्सी म्युच्युअल फंड स्कीम्सना रेटिंग देतात. रेटिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना स्कीममध्ये असणारी जोखीम आणि त्यातून मिळणारा रिटर्न याची माहिती मिळते. तसेच, रेटिंगमुळे विविध स्कीमची तुलना करता येते.
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ :