Recession News : मंदीचा फेरा आला की काय? Ola मधील कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा, पगार वाढीचं तर नावच काढू नका

Ola Laying off : एकीकडे Zomato, Blinkit आणि Swiggy सारख्या कंपन्या त्वरीत डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत असताना, Ola Dash ची सेवा बंद होणार आहे.

Recession News : मंदीचा फेरा आला की काय? Ola मधील कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा, पगार वाढीचं तर नावच काढू नका
मंदीचा फेरा ओलातच कसा आला Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 6:20 PM

देशातील अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आली नाही. अर्थव्यवस्थेसमोर (Indian Economy) अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. अमेरिकेत तर मंदीने (American Recession) अनेकांचा रोजगार हिरावला (Deprived of employment) आहे. अनेक तंत्रज्ञांचा रोजगार हिरावला आहे. तेच वारं भारतीय अर्थव्यवस्थेत शिरु पाहतंय. अजून मंदीचा फेरा आला नसला तरी ओला कंपनीच्या धोरणाने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अॅपवर आधारीत कॅब सेवा (Cab Service) देणा-या ओला कंपनीने कर्मचा-यांना डच्चू देण्यास सुरुवात केली आहे. अनेक कर्मचा-यांना कंपनीने नारळ हाती दिला आहे. एवढंच नाही तर कंपनीने परफॉर्मेंसवर (Performance Base) आधारीत अप्रॅजलही (Appraisal) टाळले आहे. याचा सरळ अर्थ त्यांना इनक्रिमेंट मिळणार नाही, बढती नाही की पगार वाढ नाही.दोन वर्षांपूर्वी या कंपन्यांनी कोरोना काळातही उत्तम कामगिरी बजावत कर्मचा-यांची नियुक्ती केली होती. आता या कंपन्या कर्मचा-यांच्या मुळावर उठल्या आहेत. यामुळे बाजारात मंदी तर आली नाही ना, अशी चर्चा सुरु आहे.

500 कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा

IANS या वृत्त संस्थेने सूत्रांच्या माहिती आधारे ही बातमी दिली आहे. त्यानुसार, ओला कंपनी जवळपास 500 कर्मचा-यांच्या हातात नारळ देणार आहे. त्यांना नोकरीवरुन काढून टाकणार आहे. कर्मचा-यांना कमी करण्याच्या हालचालींना वेग आला असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या कंपनीकडे सध्या 1100 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीला निधी जमा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच अनेकांच्या नोकरीवर गदा येण्याची भीती आहे.

स्पॉटबँकेकडून (Softbank) कंपनीला फंडिंग केले आहे. फायद्यात राहण्यासाठी कंपनीचा आकार कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यासोबतच कंपनीने कर्मचा-यांना देण्यात येणारी पगारवाढ, भत्ता, वेतन वाढ संपूर्णतः बंद केले आहे. आजतक या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे एचआर प्रमुख बालाचंदर एन यांनी कर्मचा-यांसाठी एक संदेश पाठविला आहे. त्यात कंपनी व्यापार पुनर्गठित करत असून त्यासाठी लागणा-या काळानंतर बढती, वेतन आणि अनुषांगिक लाभाबद्दल विचार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

ओला बंद करणार अनेक व्यवसाय

ओला कंपनीने त्यांचे संपूर्ण लक्ष्य इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योगावर केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची इतर अनेक व्यवसाय बंद करण्याचा धडाका लावला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने त्यांची सेंकड कार विक्रीसाठीची कंपनी Ola Cars बंद करण्याची घोषणा केली. गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ओला ने हा व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायातंर्गत 100 शहरांमध्ये 300 केंद्र सुरु करण्याची योजना ही अंधातरीच राहिली. उलट कंपनीने 5 मोठ्या शहरातील विक्री केंद्रे बंद केली आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....