Isha Ambani : ईशा अंबानी यांच्या सासू आहेत तरी कोण? त्यांचे काय आहे राजकीय कनेक्शन
Isha Ambani : रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानी मोठ्या ताकदीने सांभाळत आहे. पण त्याच नाही तर त्यांच्या सासूनेही मोठ मोठ्या पदाची जबाबदारी संभाळली आहे. पंतप्रधान कार्यालयापासूनत ते राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांचा राबता आहे. त्या आहेत तरी कोण?
नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती आणि आशियातील श्रीमंतांपैकी एक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. रिलायन्स रिटेलची (Reliance Retail) जबाबदारी ईशा अंबानी मोठ्या ताकदीने सांभाळत आहे. त्यांचे सासू-सासरे हे पण उद्योजक आहेत. ईशा अंबानी यांनी 12 डिसेंबर 2018 रोजी उद्योजक आनंद पीरामल (Anand Piramal) यांच्याशी लग्न केले होते. त्यांना कृष्णा आणि आदिया ही जुळी मुले आहेत. ईशा अंबानीच नाही तर त्यांच्या सासूनेही मोठ मोठ्या पदाची जबाबदारी संभाळली आहे. पंतप्रधान कार्यालयापासूनत ते राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांचा राबता आहे. त्या आहेत तरी कोण?
तर ईशा अंबानी यांच्या सासूचे नाव स्वाती पीरामल (Swati Piramal) असे आहे. त्या 2010 ते 2014 या काळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सायंटिफिक अॅडव्हायझरी कौन्सिल आणि कौन्सिल ऑफ ट्रेड फॉर पीएमच्या सदस्या होत्या. त्यांनी अनेक मोठ्या पदावर काम केले आहे.
स्वाती पीरामल यांनी 1980 मध्ये मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून पदव्युत्तर पदवी घेतली. त्या सध्या एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीत व्हाईस चेअरपर्सन म्हणून काम पाहतात. याशिवाय त्या मुंबईतील गोपालकृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या संस्थापिका ही आहेत.
सामाजिक कार्य आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा-सुविधा पुरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी पीरामल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे कार्य उभारले आहे. ग्रामीण भागात त्यांच्या कार्यामुळे त्यांची मोठी ओळख आहे.
स्वाती पीरामल यांची मुलगी आणि ईशा अंबानी यांनी नणंद नंदिनी पीरामल यांनाही यंग ग्लोबल अवॉर्ड मिळाला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, स्वाती पीरामल यांच्या नावे 8 वेळा जगातील 25 प्रभावशाली महिलांच्या यादीत झळकले आहे.
ईशा अंबानी (Isha Ambani) मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. त्या सध्या जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात आहे. 2014 मध्ये त्यांचे नाव आशियातील 12 शक्तिशाली भविष्यातील उद्योजिकांमध्ये घेण्यात आले होते. त्यांनी उद्योजक आनंद पीरामल यांच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले आहे. सासू सारख्याच त्या कर्तबगार महिला आहेत.
मुकेश अंबानी यांची पत्नी आणि ईशा अंबानी यांची आई नीता अंबानी (Nita Ambani) यांना सर्वच जण वहिनी म्हणतात. मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमची फ्रेंचाईज मागे नीता अंबानी यांचे परिश्रम आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मोठी भूमिका पार पाडतात. अनिल अंबानी यांनी तक्रार केली होती की, नीता, आनंद जैन आणि मनोज मोदी यांना झुकते माप देण्यात येते.