Israel-Hamas War | युद्धात पण चांदी! या स्टॉकची रॉकेट भरारी

Israel-Hamas War | युद्ध ही संधी पण असते, असे तज्ज्ञ सांगतात. युद्धामुळे अनेकांचे नुकसान होते. जीवितहानी होते. संपत्तीचे नुकसान होते. पण स्टॉक मार्केटमध्ये हे शेअर बाजारात धुमाकूळ घालत आहे. गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होत आहे. या स्टॉकने जवळपास 8 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. कोणता आहेत हे स्टॉक?

Israel-Hamas War | युद्धात पण चांदी! या स्टॉकची रॉकेट भरारी
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 5:18 PM

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल -पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Hamas War) परिणाम आणि पडसाद उभ्या जगतात पाहायला मिळत आहे. सोने-चांदीच्या किंमती एकदम उसळल्या आहेत. तर स्टॉक मार्कट सोमवारी गडगडला होता. पण अशा परिस्थितीतही काही स्टॉकने बंपर कमाई करुन दिली आहे. युद्ध ही काहीसाठी कमाईची संधी असते असे म्हणतात. युद्धात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांची मोठी कमाई होत आहे. या कंपन्यांच्या स्टॉकला (Defense Stock) अचानक मागणी आली आहे. जगभरातील गुंतवणूकदारांनी हे स्टॉक खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. त्यामुळे या स्टॉकनी जवळपास 8 टक्क्यांची भरारी घेतली आहे. कोणते आहेत हे स्टॉक?

हे आहेत ते स्टॉक

वॉल स्ट्रीटवरील या डिफेन्स स्टॉकमध्ये उसळी आली आहे. शस्त्रास्र तयार करणाऱ्या Northrop Grumman Corp, L3Harris Technologies Inc., Huntington Ingalls Industries Inc., Lockheed Martin Corp, Lockheed Martin Corp आणि General Dynamics Corp या स्टॉकने गगन भरारी घेतली आहे. अमेरिकन शेअर बाजारात या स्टॉकने 8% उसळी घेतली. S&P 500 Index वर सोमवारी या शेअर्सनी मोठी कमाल दाखवली. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाई करता आली. हमासने इस्त्राईलवर हल्ला चढवल्याने या शेअर्सनी भाव खाल्ला आहे. त्यांचे शेअर एकदम वधारले आहेत.

हे सुद्धा वाचा

हल्ल्यानंतर स्टॉककडे वळला मोर्चा

हमासने शुक्रवारी रात्री इस्त्राईलवर एकाएक हल्ला चढवला. शनिवारी पण हल्ले चालूच ठेवले. त्यानंतर इस्त्राईलने ताबडतोब त्याला प्रत्युत्तर दिले. रविवारीपासून तर युद्ध अजून भडकले. आता दोन्ही बाजूने एकमेकांवर जबरदस्त वार-प्रतिवार सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोमवारी अमेरिकन शेअर बाजारातील डिफेन्स स्टॉकवर उड्या टाकल्या. मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या सेक्टरमधील शेअरने उसळी घेतली.

या स्टॉकला फटका

एकीकडे डिफेन्स सेक्टरमधील स्टॉकमध्ये तेजी दिसून येत आहे. तर इतर क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण होत आहे. एअरलाईन्स, पर्यटन, हॉटेलिंग क्षेत्रातील स्टॉकची सावध वाटचाल सुरु आहे. त्यांना या नवीन घडामोडींचा फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांची उड्डाणं रोखून धरली आहे. तर पर्यटन क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

या कंपन्यांना फायदा

कच्चा तेलाचा वितरण, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची पण डोकेदुखी वाढली आहे. तर काही कंपन्यांना फायदा पण झाला आहे. Australia’s Woodside Energy Group आणि Santos Ltd या कंपन्यांचा शेअर वधारला आहे. तर Shell Plc आणि BP Plc मध्ये 2.6% वाढ झाली आहे. अमेरिकन कंपनी Exxon Mobil Corp आणि Chevron Corp कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.