Israel-Palestine War | इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्ध भडकले, या ‘स्टॉक’ वर दिसणार थेट परिणाम!
Israel-Palestine War | इस्त्राईल-पॅलेस्टाईन वादाचे परिणाम जगभरात सर्वदूर दिसत आहे. जगात सध्या दोन ठिकाणी युद्ध सुरु आहे. मध्य-पूर्व अशांत आहे. रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. त्याचे परिणाम भारतीय स्टॉक एक्सचेंजवर दिसत आहे. या शेअरमध्ये चढउताराचे सत्र दिसू शकते. त्यामुळे बाजारात गुंतवणूक करताना सावध रहाणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : इस्त्राईल-हमास संघर्षाचा (Israel-Palestine War) परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला. मध्य-पूर्व भागात युद्धाचे ढग दिसत असले तरी त्याचे परिणाम सर्वदूर दिसत आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. इतर देशातील मालवाहतूक प्रभावित झाली आहे. तर अनेक कंपन्यांमधील उत्पादनावर परिणाम झाला आहे. युद्धाचे पडसाद भारतीय कंपन्यांच्या व्यवहारावर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) चढउताराचे सत्र दिसून येत आहे. काही शेअरवर त्याचे थेट परिणाम दिसतील. त्यामुळे बाजारात गुंतवणूक करताना सावध असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी या शेअरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
- Sun Pharma या भारतीय कंपनीची उपकंपनी तारो फार्मास्युटिकल्स ही इस्रायल-आधारित कंपनी आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे कंपनीच्या उत्पादनासह निर्यातीवर परिणाम होत असल्याचे तारोने स्पष्ट केले आहे. Dr Reddy’s, Lupin आणि Torrent Pharma या कंपन्यांच्या निर्यातीवर पण परिणाम झाला आहे.
- Adani Ports ही इस्त्राईलमधील Haifa port चे कामकाज सांभाळते. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये 9 ऑक्टोबर रोजी जवळपास 5 टक्के घसरण दिसून आली. गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील या समूहाची घटनाक्रमावर बारीक लक्ष आहे. तसेच त्याअनुषंगाने व्यावसायीक रणनीती बदलविण्यात येणार आहे. कार्गो क्षेत्रात हायफाचा वाटा 3 टक्के आहे.
- Tata Consultancy Services (TCS) कडे या भागातील अनेक महत्वाची आणि मोठी काम हातावर आहेत. यामध्ये इस्त्राईल सरकारच्या पण अनेक कामांचा समावेश आहे. या आयटी कंपनीत इस्त्राईलमध्ये 1000 कर्मचारी काम करत आहे. त्यांच्या सुरक्षेसह कामाचे नियोजन करण्यात येत आहे. कंपनीचे घटनाक्रमावर बारीक लक्ष आहे.
- या खालील स्टॉकच्या कामगिरीवर पण त्याचा परिणाम दिसून येईल.
- भारतीय तेल विपणन कंपन्या (OMC) इस्त्राईल-पॅलेस्टाईनमधील घटनाक्रमाकडे लक्ष ठेऊन आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा व्यवसाय प्रभावित होण्याची शक्यता आहे. या भूराजकीय वादाकडे कंपन्यांचे लक्ष आहे. मध्यपूर्वेतील इंधनाचा पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे.
- इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमती आणि कंपन्यांच्या स्टॉकवर दिसून येईल. ONGC, Oil India, Mahanagar Gas, Reliance Industries, Castrol India यासह भारतीय ल्युब्रिकंट्स कंपन्यांचे स्टॉक या घडामोडींमुळे प्रभावित होऊ शकतात.
- तर या ताज्या संघर्षामुळे NMDC, Kalyan Jewellers, Infosys, Tech Mahindra, आणि Wipro या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम दिसून येईल. या कंपन्यांची कामगिरी प्रभावित होऊ शकते.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.