तुम्ही चहासोबत सोडले धूराचे वर्तुळ; तिकडे सिगारेट कंपनीने केली दमदार कमाई, प्रत्येक दिवसाला छापले इतके कोटी

Cigarette Company Profit : देशातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनीने जुले ते सप्टेंबर महिन्यात जोरदार फायदा मिळवला. चहासोबत, इतर पेयासोबत अनेक जण सिगरेट सेवन करतात. त्याचा कंपनीला मोठा फायदा झाला. केवळ सिगरेटमुळेच या कंपनीला 6.6 टक्के फायदा झाला आहे.

तुम्ही चहासोबत सोडले धूराचे वर्तुळ; तिकडे सिगारेट कंपनीने केली दमदार कमाई, प्रत्येक दिवसाला छापले इतके कोटी
सिगरेट ओढणे शरीराला हानीकारक असतेImage Credit source: प्रतिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 11:34 AM

भारतातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक कंपनी आयटीसी लिमिटेडने (ITC Ltd) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा मिळवला. कंपनीने जुले ते सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवशी 54 कोटींचा नफा मिळवला. ही कंपनी सिगरेट व्यतिरिक्त बिस्किट, फ्रोझन फूड आणि इतर एफएमसीजी उत्पादनांची विक्री करते. अर्थात सिगरेट उत्पादनातून कंपनीला अधिक नफा होतो. हासोबत, इतर पेयासोबत अनेक जण सिगरेट सेवन करतात. त्याचा कंपनीला मोठा फायदा झाला. केवळ सिगरेटमुळेच या कंपनीला 6.6 टक्के फायदा झाला आहे.

सिगरेटमधून मोठी कमाई

आयटीसी कंपनीला सिगरेट विक्रीतून सर्वाधिक कमाई झाली. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मधील जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीला एकूण निव्वळ नफा 1.8 टक्के वाढला. कंपनीचा नफा 5,054.43 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4,964.52 कोटी रुपयांचा नफा झाला. या कालावधीत आयटीसी कंपनीचा व्यवसाय 6.6 टक्के वाढला आणि तो 8,877.86 कोटींवर आला. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला सिगरेटमधून 8,328.21 कोटी रुपयांची कमाई झाली. सिगरेट सेगमेंटमध्ये आयटीसीकडे देशातील अनेक सर्वाधिक विक्री होणारे ब्रँड आहेत. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार या ब्रँडची विविध सिगरेट खरेदी करतात.

हे सुद्धा वाचा

कमाईच्या आकड्यांनी तोडले रेकॉर्ड

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आयटीसी कंपनीचा ऑपरेशनल महसूल 15.62 टक्क्यांनी वाढून 22,281.89 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षातील या तिमाहीत हा महसूली आकडा 19,270.02 कोटी रुपये होता. याच कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 20.92 टक्क्यांनी वाढून 16,056.86 कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत आयटीसीच्या इतर उत्पनासह एकूण महसूल 14.86 टक्क्यांनी वाढला. तो 22,897.85 कोटी रुपये झाला. एका वर्षापूर्वी हा आकडा 19,934.9 कोटी रुपये होता.

या सेगमेंटमध्ये पण कंपनीची कमाल

आयटीसी कंपनी एफएमसीजी, हॉटेल, अगरबत्ती, माचिस पेटी आणि स्टेनशरी सारख्या क्षेत्रात व्यवसाय करते. एफएमसीजी सेगमेंटमध्ये कंपनीचा महसूल 6.1 टक्क्यांनी वाढला, तो 14,463.15 कोटी रुपये आहे. तर यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कमाईचा हा आकडा 13,631.46 कोटी रुपये होता. तर ITC Hotel च्या व्यवसायाचा महसूल 17 टक्के वाढला. तो 789.16 कोटी रुपयांवर पोहचला. तर अगरबत्ती व्यवसायाच्या माध्यमातून कंपनीची कमाई 46.57 टक्क्यांनी वाढली आणि ती 5,845.25 कोटी रुपये झाली. आयटीसी लिमिटेडचा शेअर गुरूवारी बीएसईवर 471.85 रुपयांवर बंद झाला होता. तर आज सध्या 11:25 मिनिटांना तो 489 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. आज त्यामध्ये 17.35 अंकांची वाढ दिसली.

Non Stop LIVE Update
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?
'संजयमामा शिंदेंनी सर्वांना फसवलं, त्यांना तोंड...', कोणाचा घणाघात?.
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू
शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरू.
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?
'या' दिग्गजांनी भरले अर्ज, कुठे तडगी फाईट अन् कोणी केला विजयाचा दावा?.
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'
जरांगेंकडून इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असताना धमकी, '10 मिनिटांत...'.
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.