Bank Account : झिरो बॅलन्स खाते उघडा, 1.30 लाखांचा फायदा मिळवा..

Bank Account : झिरो बॅलन्स खात्यासोबत तुम्हाला 1.30 लाखांचा फायदा मिळवता येईल..

Bank Account : झिरो बॅलन्स खाते उघडा, 1.30 लाखांचा फायदा मिळवा..
झिरो बॅलन्स खाते Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 8:19 PM

नवी दिल्ली : पंतप्रधानमंत्री जनधन योजनेच्या (PM Jan Dhan Yojana- PMJDY) माध्यमातून नागरिकांना जन धन खाते (Jandhan Account) उघडता येते. ही सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली सर्वात महत्वकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे. या योजनेत गरीब व्यक्ती बँकेत खाते उघडू शकते. या खात्यातंर्गत अनेक फायदे मिळतात..

पंतप्रधान जन धन योजनेतंर्गत खाते उघडल्यावर खातेधारकाला एकूण 1.30 लाखांचा फायदा मिळतो. यामध्ये अपघात विम्याचाही समावेश आहे. खातेदाराला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि सोबतच 30,000 रुपयांचा साधा विमा देण्यात येतो.

खातेदाराचा अपघात झाला तर त्याला 30,000 रुपये देण्यात येतात. खातेदाराचा अपघातात मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसाला, कुटुंबियांना एक लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. म्हणजे एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ होईल.

हे सुद्धा वाचा

हे खाते उघडल्यानंतर त्यामध्ये एक छदामही नसला तरी तुम्हाला बँक दंड लावत नाही. सरकारचा हा सर्वात महत्वकांक्षी आर्थिक कार्यक्रम असल्याने या खात्यावर सरकार अनेक लाभ ही देते.

कोणत्याही सार्वजनिक बँकेच्या शाखेत जनधन खाते उघडता येते. हे बचत खाते आहे. त्यातंर्गत अनेक सोयी-सुविधाही मिळतात. या खात्यात तुम्हाला बॅलन्स ठेवण्याची गरज नाही.

खासगी बँकेतही जनधन योजनेतंर्गत खाते उघडता येते. जर तुमच्याकडे अगोदरच बँकेचे खाते असेल तर हे खाते तुम्हाला जनधन खात्यात रुपांतरीत करता येते. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्याला जनधन खाते उघडता येते.

जनधन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत व्यक्तीचे महत्वाचे कागदपत्रे पडताळा करुन घेणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड आदींचा समावेश आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.