या आणि मुलं पैदा करा…जपानच्या सरकारने जगभरतील पुरुषांना खरंच पाठवलंय का आवतान? या ब्रीडिंग व्हिसाचे गुपित तरी काय?

Japan Breeding Visa : जपान झपाट्याने म्हातारा होत आहे. कधीकाळी तरुणांचा देश असलेल्या पूर्वेतील या देशाची लोकसंख्या झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत आहे. त्यामुळे आता या अडचणीवर मात करण्यासाठी जपानने त्यांच्या व्हिसा नियमात मोठा बदल केला आहे. सोशल मीडियावर ब्रीडिंग व्हिसाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या आणि मुलं पैदा करा...जपानच्या सरकारने जगभरतील पुरुषांना खरंच पाठवलंय का आवतान? या ब्रीडिंग व्हिसाचे गुपित तरी काय?
परदेशी कामगारांना जपानचे आवतान
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 9:19 AM

पूर्वेतील उद्योगी देश जपानचे जगभर कौतुक आहे. अगदी टिकली एवढ्या या देशाने प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे. पण जपान झपाट्याने वृद्ध होत आहे. या देशात वृद्धांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सरकारने या समस्येवर मात करण्यासाठी जगभरातील कामगारांना आमंत्रित केले आहे. पण त्यावरुन सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ब्रीडिंग व्हिसाची समाज माध्यमांवर चर्चा सुरु आहे. या आणि मुलं जन्माला घाला असा वेगळाच मॅसेज यामाध्यमातून पसरला आहे. काय आहे त्याचे सत्य? जपान सरकार कामगारांना मुलं पैदा करण्यासाठी बोलवत आहे की विविध कारखान्यात काम करण्यासाठी यावरून नवा वाद उफाळला आहे.

व्हायरल मॅसेज काय?

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर अनेक समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर असा मॅसेज पुढे पाठवत आहेत. जगभरातील पुरुषांना जपान सरकारने आवताण धाडल्याचा दावा करण्यात येत आहे. आता जगभरातील पुरुष जपानची लोकसंख्या वाढवण्यासाठी हातभार लावतील, असा तो मॅसेज आहे. पण या देशाचे असे कोणतेही धोरण नाही. हा दावा एकदम चूक आहे. पूर्वेतील देशाने Working Visa च्या नियमात मोठे बदल केले आहे. पण त्याचा उद्देश जपानची लोकसंख्या वाढवणे नाही तर तिथल्या कामगारांची संख्या वाढवणे असा आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे नवीन नियम

जपानची वृत्तसंस्था क्योडो न्यूजने यावर्षी एप्रिल महिन्यात याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, तिथल्या सरकारने परदेशी कामगारांच्या व्हिसा धोरणात बदल केला आहे. देशातील कामगारांची घटलेली संख्या पूर्ववत करण्यासाठी परदेशी कामगारांना बोलवण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांसाठी प्रवासी व्हिसाची सोय करण्यात येत आहे.

मग ही मुलं पैदा करण्याची अफवा उठली कोठून?

आता हे वृत्त प्रकाशित झाले होते 1 एप्रिल रोजी. त्यादिवशी खरंतर एप्रिल फुल्ल असतो. त्यादिवशी जपानमधील एक वेबसाईट सोरा न्यूज 24 ने ही बातमी थोड्या मिश्किल रुपात मांडली. त्यांनी जपानमध्ये या आणि मुलं पैदा करा अशा स्वरुपात ही बातमी मांडली आणि ती जगभर व्हायरल झाली. पाहता पाहता या खोट्या वृत्ताने तरुणाईला एकच वेड लावले आणि काहींनी तर जपानला बिगीबिगी जाण्याची स्वप्न पण रंगवली.

जन्मदरात मोठी घसरण

जपानमध्ये परदेशी कामगारांची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. त्यामागे अनेक कारण आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण जपानी कुटुंबातील घटलेला जन्मदर आहे. त्यामुळे जपान सरकारने यावर्षी एप्रिल ते पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी कुशल मनुष्यबळ व्हिसा कार्यक्रमार्तंगत 8,20,000 परदेशी कामगारांना देशात बोलावले आहे.

मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.