नरेश गोयल यांना कॅनरा बँक घोटाळा अंगलट, 538 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
Naresh Goyal | कॅनेरा बँक घोटाळा प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना चांगलचा झटका बसला. त्यांच्यासह पाच जणांवर यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोयल यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गोयल सध्या कारागृहात आहेत. या दणक्यामुळे अनेक घोटाळेबाजांना चाप बसणार आहे.
नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बँक घोटाळ्यात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतर पाच जणांना दणका दिला. त्यांच्याविरोधात मोठी कार्यवाही केली. ईडीने याप्रकरणात त्यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने 31 ऑक्टोबर रोजी नरेश गोयल यांच्यासह इतर आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कॅनेरा बँकेला 538 कोटी रुपयांचा चूना लावल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणात नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
ईडीचे म्हणणे तरी काय
ईडीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (PMLA) 2002 मधील विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत 538 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये अनेक कंपन्या आणि व्यक्तींच्या मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 17 रहिवाशी फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. जेट एअरवेजची स्थापना नरेश गोयल यांनी केली आहे. ईडीने या प्रकरणात गोयल यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांना पण आरोपी केले आहे.
व्यवस्थापन गडबडले
जेट एअरवेजचे व्यवस्थापन गडबडले. नरेश गोयल यांच्यावर ईडीचा फास आवळल्या गेला. फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कॅनेरा बँकेच्या तक्रारीनंतर अडचणीत आणखी वाढ झाली. बँकेने जेट एअरवेजला 848.86 कर्ज मंजूर केले होते. त्यातील 538.62 कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्यातूनच त्यांना अटक झाली.
कॅनेरा बँकेची तक्रार
ईडीने कॅनेरा बँकेला लिखीत तक्रार दिली होती. त्याआधारे ही संपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरु केला. कॅनेरा बँकेच्या तक्रारीनंतर गयोल यांच्यासह इतर जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने केलेल्या तपासानुसार, जेट एअरवेजने एसबीआय आणि पीएनबी यांच्यासह इतर बँकांमधील कर्ज प्रकरणात हेराफेरी केली आहे. नरेश गोयल यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. त्यासाठी जेट एअरवेजच्या बँलन्स शीटमध्ये हेराफेरी करण्यात आली आहे.