विमान प्रवास महागणार? आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका, ATF च्या दरात वाढ

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. विमान इंधनाच्या (Jet Fuel) दरात वाढ करण्यात आली आहे. विमानाचे इंधन एटीएफचे (ATF) दर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत.

विमान प्रवास महागणार? आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका, ATF च्या दरात वाढ
विमान इंधनाचे भाव वाढले
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:51 AM

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. विमान इंधनाच्या (Jet Fuel) दरात वाढ करण्यात आली आहे. विमानाचे इंधन एटीएफचे (ATF) दर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एटीएफचे भाव 1,12,925 किलोलीटरवर पोहोचले आहेत. भाववाढीपूर्वी एटीएफचे दर 1,10,666 रुपये किलोलीटर होते. नवे दर येत्या 15 एप्रिल 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात सातव्यांदा एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव तब्बल दहा दिवसांनंतर आज स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel Price) भावात आज कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 6.84 पैशांनी वाढले आहेत.

विमान प्रवास महागणार?

विमान इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होतच आहे. आज पुन्हा एकादा एटीएफमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार जेट फ्यूलचे दर 1,12,925 किलोलीटरवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात एटीएफमध्ये तब्बल सातवेळा वाढ झाली आहे. एटीएफमध्ये होत असलेली ही वाढ पाहाता विमान कंपन्या देखील तिकीट वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळात विमान सेवा ठप्प असल्याने आधीच मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आता इंधनाचे दर वाढल्याने त्यात आणखी भर पडली आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

इंधन दरवाढीसंदर्भात दिलासादायक बामती समोर येत आहे. 22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत होती. दहा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळा भाव वाढवण्यात आले होते. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून भाव स्थिर आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 93.07 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपये आहे. तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

संबंधित बातम्या

पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर

Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Top Multibagger Stock: गेल्या आर्थिक वर्षात ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला सर्वाधिक 3, 381.71 टक्क्यांचा परतावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.