Multibagger Share : हाच खरा मार्केटचा राजा! 3 वर्षांत केले करोडपती, 2 रुपयांच्या शेअरची धमाल

Multibagger Share : बाजारात काही शेअर हे बम्पर लॉटरी सारखे असतात. ते इतके मालामाल करतात की जगाचा त्यावर विश्वास बसत नाही. या शेअरने अशीच काहीशी कमाल केली आहे.

Multibagger Share : हाच खरा मार्केटचा राजा! 3 वर्षांत केले करोडपती, 2 रुपयांच्या शेअरची धमाल
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:37 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात काही अविश्वसनीय घडामोडी घडतात. रात्रीतून काहीजण स्टार होतात. काहींना बम्पर लॉटरी लागते. कंपनीच्या कामगिरीमुळे गुंतवणूकदार लखपती, करोडपती होतात. या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger Return) आता एसजी फिनसर्व स्‍टॉकचं (SG FinServ Stock) नाव आलं आहे. अवघ्या 3 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती केले. तीन वर्षांत या शेअरने 25407 टक्क्यांचा परतावा दिला. तर दोन वर्षांत या शेअरने 28130 टक्क्यांचा परतावा दिला. तीन वर्षांपूर्वी हा स्टॉक अवघ्या 2 रुपयांना होता. आता या पेन्नी स्टॉकची किंमत 714 रुपयांच्या घरात गेली आहे.

उच्चांक गाठला गुरुवारी या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा स्टॉक 52-आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, 714.20 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच कारभारी सत्रात या शेअरचा भाव 23 टक्क्यांनी वधारला. ही कंपनी बँकिंग गुंतवणूक आणि निधी व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

इतका झाला नफा एसजी फिनसर्वचे मार्केट कॅम्प 2,950 कोटी रुपयांचे आहे. कंपनीने 2023 मधील मार्च तिमाहीत 14.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी समान तिमाहीत या कंपनीने 0.69 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीत प्रमोटरचा हिस्सा 50.88 टक्के आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 49.12 टक्के वाटा आहे.

हे सुद्धा वाचा

2 रुपये ते 714 रुपयाचा टप्पा ही कंपनी अगोदर मुंगिपा सिक्योरिटीज लिमिटेड या नावाने ओळखल्या जात होती. वर्ष 2020 मध्ये SG फिनसर्व हा शेअर अवघ्या 2 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. 2021 मध्ये या शेअरमध्ये वाढ सुरु झाली. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिलेच नाही. तीन वर्षांत या शेअरने 25407 टक्क्यांचा परतावा दिला. तर दोन वर्षांत या शेअरने 28130 टक्क्यांचा परतावा दिला. एका वर्षांत या शेअरने जवळपास 900 टक्क्यांचा रिटर्न दिला. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 255 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला.

Linde India पण जोरात जर तुम्ही Linde India या कंपनीचा शेअर खरेदी केला असेल अथवा खरेदी करण्याची तयारी असले तर हा फायद्याचा सौदा ठरला आहे. कंपनीला यंदा चांगला फायदा झाला. त्यामुळे कंपनीने 12 रुपये प्रति शेअर लाभांश दिला. तसेच कंपनीने गुंतवणूकदारांना 7.50 रुपयांचा विशेष लाभांश देण्याची घोषणा केली. मंगळवारी या शेअरमध्ये घसरणीचे सत्र दिसून आले. हा शेअर बाजारात 3870 रुपयांवर ट्रेड करत होता. आज 24 मे रोजी हा शेअर 3997.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज हा शेअर 127.40 रुपयांनी वधारला.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.