Shilpa Shetty IPO : शिल्पा शेट्टी हिची कंपनी आणणार IPO, कमाईची मोठी संधी

Shilpa Shetty IPO : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची ही कंपनी गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहे. या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होत आहे. त्यासाठी SEBI ची मंजूरी मिळाली आहे.

Shilpa Shetty IPO : शिल्पा शेट्टी हिची कंपनी आणणार IPO, कमाईची मोठी संधी
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 2:12 PM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : तुम्ही कमाईची संधी शोधत असाल तर थोडी प्रतिक्षा करा. गेल्या पंधरा दिवसात अनेक कंपन्यांनी बाजारात आयपीओ उतरवले आहेत. त्यातील काहींना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या आठवड्यात पण अनेक कंपन्यांनी आयपीओ आणले होते. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची कंपनी पण बाजारात आयपीओ आणत आहे. शिल्पा शेट्टीची कंपनी मामा अर्थ (Mama Earth IPO) आणि द डर्मा की पॅरेंट कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड आयपीओ आणत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे. यावर्षीच मार्च महिन्यात ही कंपनी आयपीओ बाजारात उतरणार होती. पण बाजारावर मंदीचे सावट असल्याने आयपीओ थांबविण्यात आला.

इतक्या शेअरची विक्री

मामा अर्थ ची मुळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड आहे. या कंपनीच्या ड्राफ्ट पेपर्सनुसार 400 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर आणि 4,68,19,635 सध्याचे शेअर, शेअरधारकांना IPO मार्फत विक्री करण्यात येतील. कंपनीचे सहसंस्थापक आणि प्रमोटर्स वरुण अलघ, गजर अलघ, शिल्ला शेट्टी, रोहित कुमार बंसल, सोफिना वेंचर्स आणि कुणाल बहल हे आहेत.

हे सुद्धा वाचा

शिल्पा शेट्टीचे शेअर किती

2018 मध्ये शिल्ला शेट्टी हिने या कंपनीत 16 लाख शेअर खरेदी केले होते. त्यासाठी शेट्टीला 41.86 रुपये मोजावे लागले होते. या कंपनीत तिची एकूण 0.52 टक्के हिस्सा आहे.

पती-पत्नीने सुरु केली कंपनी

मामा अर्थची सुरुवात 2016 मध्ये वरुण आणि गजल अलघ यांनी केली. पती-पत्नीचा हा स्टार्टअप आहे. हा दिल्ली जवळील गुरुग्राम येथील स्किनकेअर आणि बेबीकेअर युनिकॉर्न आहे. यावर्षी जानेवारीत या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला.

फायद्याचे गणित

मार्च 2022 मध्ये संपूर्ण आर्थिक वर्षात या कंपनीने 14 कोटी रुपयांचा नफा मिळवला. या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल वधारुन 943 कोटी रुपयांवर पोहचला. त्यापूर्वी महसूलचा आकडा 456 कोटी रुपयांवर अडकला होता. गजल अलघ हे शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सत्रातील जज पण होते.

आयपीओत कशी करणार गुंतवणूक

शिल्पा शेट्टी हिच्या या कंपनीचा IPO खरेदीसाठी गुंतवणूकदाराकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खाते तुम्ही कोणत्याही ब्रोकिंग फर्मच्या आधारे उघडू शकता. आयपीओ खरेदीसाठी गुंतवणूकदारांना 3-10 दिवसांचा कालावधी मिळतो. याच कालावधीत गुंतवणूकदारांना ब्रोकरेज फर्मच्या मदतीने आयपीओत गुंतवणूक करता येते.

हा आयपीओ बाजारात

आयपीओ गुंतवणूकदारांसाठी जोरदार बातमी आहे. बायोटेक्नॉलॉजी फर्म कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ (Concord Biotech IPO) बाजारात दाखल झाला आहे. 4 ऑगस्ट म्हणजे आजपासून हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी उघडला गेला आहे. या आयपीओला 8 ऑगस्टपर्यंत सब्सक्राईब करता येईल.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.