8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा नवा फॉर्म्युला काय?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतनाचाही (8th Pay Commission) लाभ मिळण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा नवा फॉर्म्युला काय?
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 8:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतनाचाही (8th Pay Commission) लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये सरकारने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. त्यानंतर आता 5 वर्षांनी 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याशिवाय यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा नवा फॉर्म्युला ठरणार असल्याच्याही चर्चा आहेत. यानुसार अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींच्या वाढत्या किमतीच्या प्रमाणात पगारवाढ करण्याचा विचार होत आहे (Know all about speculation of 8th Pay Commission and Salary Formula to government employees).

देशात 8 वा वेतन आयोग आणि पगार वाढीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा असली तरी सरकारी पातळीवर यापैकी कशावरही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या किमती आणि राहण्याचा खर्चाचा या फॉर्म्युल्यात प्रामुख्याने विचार होणार आहे. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचीही जोरदार चर्चा आहे.

पगारवाढीचा नवा फॉर्म्युला काय?

केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी ज्या फॉर्म्युल्याची चर्चा आहे त्याचं नाव आहे ‘Aykroyd Formula’. या फॉर्म्युल्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराला महागाई, राहण्याचा खर्च आणि कार्यालयातील कामाचा परफॉर्मन्स असं एकत्रित बघितलं जातं. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा फॉर्म्युला चांगला असल्याचं म्हटलंय, मात्र त्यावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं. तसेच 8 व्या वेतन आयोगाचीही कोणतीही चर्चा नसल्याचं सांगण्यात आलंय.

7 व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना काय दिलं?

केंद्र सरकारने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारुन त्यांची अंमलबजावणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांचं कमीत कमी वेतन 7 हजार रुपयांवरुन 18 हजार झालं. या आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती माथुर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार महागाई आणि इतर निकषांनुसार दरवर्षी वाढवण्याचीही शिफारस केली होती. मात्र, यावर केंद्र सरकारने अधिकृतपणे काहीही निर्णय घेतलेला नाही.

हेही वाचा :

7th Pay Commission: कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना धक्का, मे महिन्यात DA मध्ये वाढ नाहीच

मोठी बातमी! केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारचा मोठा दिलासा; LTC ची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत बिलं जमा करता येणार

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वेतननिश्चितीबाबत मोठा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Know all about speculation of 8th Pay Commission and Salary Formula to government employees

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.