Income Tax: या पद्धतीने गुंतवणूक केल्यास 2 लाख रुपयांपर्यंत कर बचत, कसं ते सविस्तर वाचा…
कर भरणाऱ्यांसाठी काही गोष्टी माहिती करुन घेतल्यास जवळपास 2 लाख रुपये वाचू शकतात.
मुंबई : कर भरणाऱ्यांसाठी काही गोष्टी माहिती करुन घेतल्यास जवळपास 2 लाख रुपये वाचू शकतात. यात कर बचतीच्या काही योजनांसह आयकराच्या काही कलमांचाही समावेश आहे. या दोन्ही गोष्टींचा उपयोग करुन ही करबचत करता येते. यात 80 सी, 80 डी आणि 80 टीटीए सारख्या अनेक कलमांचा समावेश आहे. याशिवाय नॅशनल पेंशन सिस्टमचाही (NPS) या कर सवलत मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये समावेश करु शकता. यामुळे तुमची 2 लाख रुपयांची बचत होऊ शकते (Know how to save more than 2 lacs from income tax in India).
1. सेक्शन 80 सीसीडी (1) – हे कलम सेक्शन 80 सी अंतर्गत येतं. यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते. यानुसार बेसिक पगाराच्या 10 टक्के किंवा 1.5 लाख रुपयांची करमुक्त गुंतवणूक करता येते.
2. 80 सीसीडी (बी) – 80 सी व्यतिरिक्त करदाते यातून अधिकचे 50,000 रुपयांची बचत करु शकतात.
80 सीसीडी (2) – हे कलम कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या पगारावर लागू आहे. यानुसार सॅलरी (बेसिक आणि डीए) मिळून 10 टक्क्यांपर्यंत कंपनीचं योगदान कर कपातीसाठी योग्य मानलं जातं. ही रक्कम कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात कंपनी जे पैसे जमा करते त्याच्या 10 टक्के करकपातीवर करदाते बचत करु शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 14 टक्के आहे. अशाप्रकारे एनपीएस कर्माचाऱ्याचे 2 लाख रुपयांची बचत करण्यास मदत करते
कर वाचवण्याचा ‘फंडा’
खासगी क्षेत्रात काम करणारे एनपीएसच्या माध्यमातून किती कर वाचवला जाऊ शकतो. यानुसार 10 टक्के कपातीवर दावा केला जाऊ शकतो. म्हणजे बेसिक सॅलरी 8,00,000 रुपये असेल तर त्याच्या 10 टक्के म्हणजे 80,000 रुपयांवर कपातीवर दावा करता येतो.
अशाप्रकारे सेक्शन 80 सीसीडी (1) चे दीड लाख रुपये, 80 सीसीडी (बी) नुसार आणखी 50 हजार रुपये आणि 80 सीसीडी (बी) अंतर्गत कंपनीच्या एनपीएस कॉन्ट्रिब्यूशनवर बेसिक सॅलरीच्या 10 टक्के म्हणजे 80 हजार रुपये असे एकूण 2,80,000 रुपयांची बचत होते. कंपनीच्या एनपीएस कॉन्ट्रिब्यूशनवर 10 टक्के किंवा बेसिक पगाराच्या आणि डीएच्या 10 टक्के फायदा होतो.
हेही वाचा :
Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक
परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना मोठा दिलासा, 30 जूनपर्यंत बँकामध्ये ‘हे फॉर्म’ ऑफलाईन भरता येणार
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर
व्हिडीओ पाहा :
Know how to save more than 2 lacs from income tax in India