Bank Holidays : नवीन वर्षाचं स्वागत करताना सुट्यांचंही ठेवा भान, जानेवारीत इतक्या दिवस बँकांना राहील कुलूप
Bank Holidays : नवीन वर्षात बँकांना सुट्यांचा सुकाळ असेल..
नवी दिल्ली : डिसेंबर (December) महिना संपायला आता काही दिवसच बाकी आहे. तुमच्या डोक्यात सेलिब्रेशनची घंटा वाजत असेल. पण काही महत्वाची कामे करण्यास बिलकूल विसरु नका. नवीन वर्षात, 2023 मध्ये बँकांना सुट्या (Bank Holidays) राहतील. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारी 2023 मध्ये बँकांना 11 दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित काही काम असेल तर पटकन उरकून घ्या. नाहीतर आनंदाच्या भरात बँकेच्या कामासाठी नाहक वेळ लागेल आणि काम काही लवकर पूर्ण होणार नाही.
पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. नाहीतर त्यासाठी वेळ लागेल.
RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते. त्यादिवशी बँकेचे कामकाज होत नाही.
पुढील महिन्यात 1, 2, 3, 4, 8, 14, 15, 22, 26, 28 आणि 29 जानेवारी रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहितील. त्यामुळे ग्राहकांना वेळतच बँकेसंबंधीची कामे उरकून घेणे महत्वाचे आहे.
बँकेची सुट्टी असली तरी तुम्हाला मोबाईल बँकिंग अथवा ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने रक्कम हस्तांतरीत करता येईल. तर रोख रक्कम हवी असेल तर तुम्हाला एटीएमचा वापर करता येईल. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
जानेवारी 2023 मधील बँक सुट्यांची संपूर्ण यादी
1 जानेवारी 2023- रविवार (सर्वच बँकांना सुट्टी) 2 जानेवारी 2023 (नवीन वर्षानिमित्त बँकेला सुट्टी) 3 जानेवारी 2023- सोमवार (इंफाळमध्ये बँकेला सुट्टी) 4 जानेवारी 2023- मंगळवार (इंफाळमध्ये बँकेला सुट्टी) 8 जानेवारी 2023- रविवार (सर्वच बँकांना सुट्टी) 14 जानेवारी 2023- मकर संक्रांती (दूसरा शनिवार) 15 जानेवारी 2023 पोंगल/माघ बिहू/रविवार (सर्वच राज्यात सुट्टी) 22 जानेवारी 2023- रविवार 26 जानेवारी 2023- गुरुवार- (प्रजासत्ताक दिवस) 28 जानेवारी 2023- चौथा शनिवार 29 जानेवारी 2023-रविवार