UPI Payment | एका दिवसांत UPIमधून किती पैसे करू शकता ट्रान्सफर? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी…

गेल्या वर्षभरात यूपीआय व्यवहारात 76.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मूल्यानुसार ही आकडेवारी दुप्पट झाली आहे.

UPI Payment | एका दिवसांत UPIमधून किती पैसे करू शकता ट्रान्सफर? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी...
गेल्या वर्षभरात यूपीआय व्यवहारात 76.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 6:01 PM

मुंबई : नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत ट्वीट केले की, जानेवारी 2021मध्ये यूपीआयमार्फत 230 कोटी व्यवहार झाले होते, ज्यामुळे सुमारे 4.3 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. गेल्या वर्षभरात यूपीआय व्यवहारात 76.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मूल्यानुसार ही आकडेवारी दुप्पट झाली आहे. भारतात दरमहा एक अब्ज व्यवहारांचा टप्पा पार करण्यासाठी यूपीआयला तब्बल 3 वर्षे लागली. पुढील एक अब्ज व्यवहार 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होतील. आपण अद्याप यूपीआय वापरत नसल्यास, आपण यूपीआय खाते कसे उघडटा येते आणि ते कसे वापरले जाते? याबाबतची माहिती जाणून घेऊया…(Know the details about UPI Payment system)

यूपीआय म्हणजे काय?

यूपीआयच्या मदतीने आपण कोणाच्याही खात्यात कधीही पैसे हस्तांतरित करू शकता. यूपीआयचे अ‍ॅप्स विशेष आहेत, कारण ते केवळ पेमेंटसाठीच काम करत नाहीत तर इतरही अनेक गोष्टीहे करतात. यासाठी तुम्ही बीआयएचआयएम, फोन पे, गुगल पे, मोबिक्विक, पेटीएम सारख्या बर्‍याच अ‍ॅप्सच्या मदतीने यूपीआय वापरू शकता.

युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआयचा वापर मोबाईलमधून दुसर्‍या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. ही एक संकल्पना आहे, जी बर्‍याच बँक खात्यांना मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे निधी हस्तांतरित करण्यास परवानगी देते. हे भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केले आहे. यूपीआय रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशनद्वारे नियंत्रित केले जाते.

यूपीआय खाते कसे तयार करावे?

आपण यूपीआय खाते तयार करण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करू शकता. यानंतर, आपल्याला आपला मोबाईल नंबर त्यात प्रविष्ट करावा लागेल आणि त्यावर नोंदणी करावी लागेल. यानंतर आपल्याला आपले बँक खाते त्यात जोडावे लागेल.

खाते जोडल्यानंतर, आपल्याला आपल्या बँकेचे नाव त्या यादीत शोधावे लागेल. बँकेच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले खाते जोडावे लागेल. जर आपला मोबाईल नंबर आपल्या खात्याशी लिंक असेल तर ते खाते यादीत दिसून येईल. यानंतर आपले खाते निवडा. यानंतर, आपल्याला देय देण्यासाठी आपल्या एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल. यानंतरच आपले यूपीआय खाते तयार होईल (Know the details about UPI Payment system).

यूपीआयच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस तयार करावा लागेल. यानंतर, आपणास तो आपल्या बँक खात्यासह जोडावा लागेल. व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस आपला बँकिंग अ‍ॅड्रेस बनतो. यानंतर, आपल्याला बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव किंवा आयएफएससी कोड इत्यादी लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही.

यूपीआयद्वारे काय काय करू शकता?

– आपण यूपीआय मार्फत बिल भरू शकता. या व्यतिरिक्त आपण एखाद्यास ऑनलाइन पैसे देऊ शकता. तसेच, आपण थेट बँक खात्यात पैसे हस्तांतरित आणि रिचार्ज देखील करू शकता.

– आयएमपीएसच्या (इन्स्टंट फंड ट्रान्सफर) मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याने, त्याचा उपयोग सुट्टीच्या दिवाशीसुध्दा कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो.

– एका मोबाइल अनुप्रयोगासह एकाधिक बँक खात्यांमधून व्यवहार केले जाऊ शकतात. यासाठी बँकेने दिलेला व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस वापरला जातो. तसेच, आयएफएससी कोड आणि मोबाईल नंबरचा वापर करून पैसे ट्रान्सफर केले जातात.

– प्रत्येक पेमेंट अधिकृत करण्यासाठी एम-पिन (मोबाईल पिन) आवश्यक आहे. इंटरनेट कनेक्शन नसलेल्या फोनवर *99 # डायल करूनही या सेवेचा लाभ घेता येतो. प्रत्येक बँकेमध्ये यूपीआय प्लॅटफॉर्म असतो जो मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम (अँड्रॉइड, विंडोज किंवा आयओएस) नुसार विकसित केला जातो.

एका दिवसात यूपीआयमार्फत किती पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात?

एनपीसीआयच्या वेबसाईटनुसार आता एका खात्यातून दररोज 1 लाख रुपयांचा व्यवहार केला जाऊ शकतो. या उच्च मर्यादेअंतर्गत, विविध बँकांनी स्वत:च्या उप-मर्यादा कायम ठेवल्या आहेत. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल.

(Know the details about UPI Payment system)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.