GOLD PRICE TODAY: मुंबईत सोन्याच्या भावात घसरण; पुणे, नाशकात स्थिर; जाणून घ्या आजचे भाव
राजधानी मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46400 व 24 कॅरेट सोन्याला 50620 रुपये भाव मिळाला. सोन्यानं पन्नास हजारांचा टप्पा पार केल्याने सोने गुंतवणूकदारांच्या (GOLD INVESTOR) आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुंबई : सोन्याच्या भावात तेजीनंतर घसरणीचा आलेख दिसून आला. आज (बुधवारी) राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाले. मुंबईत सोन्याच्या भावात सरासरी 200 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46200 व 24 कॅरेट सोन्याला 50400 रुपये भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोन्याच्या भाव पन्नास हजारांच्या पलीकडे कायम राहिला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 200 रुपयांची घसरण दिसून आली. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची भाववाढ दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता(SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडी यामुळे गुंतवणुकदारांत (GOLD INVESTOR) अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीकडे अनेकांनी आपला मोर्चा वळविला आहे. आगामी काही दिवसांत भाववाढ कायम राहील अशा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 50,400 रुपये (220 घट) • पुणे- 50,560 रुपये (10 वाढ) • नागपूर- 50,560 रुपये (10 वाढ) • नाशिक- 50,560 रुपये (10 वाढ)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 46,200 रुपये (200 घट) • पुणे- 46,150 रुपये (200 घट) • नागपूर- 46,150 रुपये (200 घट) • नाशिक- 46,150 रुपये (200 घट)
गुंतवणूकदारांचा मोर्चा ‘सोन्या’कडे?
शेअर बाजाराला मोठ्या पडछडीला सामोरे जावं लागलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरता, आजवरच्या सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सोन्याची खरेदी करताना सावधान?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
मुलाच्या नावे मुदत ठेव केल्यास मिळणा-या व्याजावर कोणाला भरावा लागेल कर ? जाणून घ्या नियम