सोन्याच्या पन्नास हजारी घौडदोडीला ब्रेक; खरेदीदारांसाठी संधी, जाणून घ्या आजचे भाव

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 45800 व 24 कॅरेट सोन्याला 49970 रुपये भाव मिळाला.

सोन्याच्या पन्नास हजारी घौडदोडीला ब्रेक; खरेदीदारांसाठी संधी, जाणून घ्या आजचे भाव
काय आहेत आजचे सोन्याचे दर?
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 9:07 PM

मुंबई : सोन्याच्या भावात घसरणीचे सत्र कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज (गुरुवारी) महाराष्ट्रात सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदविली गेली. मुंबई, नागपूर, नाशिक व पुण्यात सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत घसरला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 45800 व 24 कॅरेट सोन्याला 49970 रुपये भाव मिळाला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याची घसरण दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता(SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थ घडामोडी यामुळे गुंतवणूकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव पुढील प्रमाणे

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 49,970 रुपये (430 घट) • पुणे- 49,900 रुपये (660 घट) • नागपूर- 49,900 रुपये (660 घट) • नाशिक- 49,900 रुपये (660 घट)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 45,800 रुपये (400 घट) • पुणे- 45,760 रुपये (390 घट) • नागपूर- 45,760 रुपये ( 390 घट) • नाशिक- 45,760 रुपये (390 घट)

सोन्याची खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात पडझडीचं सत्र, सेन्सेक्स 104 अंकांनी घसरला; निफ्टी डाउन

हिमालयातल्या अज्ञात साधूच्या इशाऱ्यावर कोट्यवधींचा शेअर बाजार? माजी सीईओ चित्रा रामकृष्णांवर छापे, म्हणतात, ती एक अदृश्य शक्ती!

Loan Scheme : 5 लाख हवेत, तेही विना गॅरंटी? PayTM आहे ना! नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.